अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव दि 22-आमदार मंगेश चव्हाण यांनी अवैध धंदे तालुक्यातुन हद्द पार करण्याचा निर्णय घेतला असून सद्या चाळीसगाव शहरात आमदार साहेबांच्या कार्य कडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे,16 तारखेला रात्री झालेल्या कारवाईत पन्नास ते साठ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता या कारवाईचा पुढील भाग म्हणून मुख्य सुत्रदार शोधण्याचे पोलीस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते हे आव्हान पेलत पोलीस प्रशासनाने साखळी ची एक महत्वाची कडी हाती लागली ती कडी म्हणजे आरोपी गुटखा किंग देवरे ही होती या कारवाईत चाळीसगाव तालुक्यातून देवरे नामक गुटखा किंग यास अटक करण्यात आली पण ही नुसती कडी आहे की पूर्ण साखळी ये तपासाअंती समोर येणारच मात्र तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा आहे की या या गुटख्याच्या तलावातील देवरे हा इतका मोठा मासा आहे की एका वेळेस 50 ते 60 लाखाचा माल आणू शकतो? की आजून काही मोठे मासे या गुटख्याच्या तलावात आहेत? पोलीस प्रशासन नक्कीच आपल्या समोर असणारे गुटखा माफियांचे आव्हान सक्षम पने पेलणार पण पुढील तपासात काय समोर येते की खेळ इथेच संपणार की इथून सुरू होणार, आरोपी देवरे यास अटक झाल्यानंतर आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे 2 दिवसात काय समोर येणार या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहेत तपासात कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.