संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे सजावटीचे कार्य वर्ष उलटून ही अपूर्ण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्वराज्य निर्माण सेनेचे नगरपालिका प्रशासनास निवेदन,काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी.
सर्व प्रथम आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवराय आहे , त्यांचे नाव त्यांची कीर्ती त्यांचे स्मारक हे जग भरात प्रसिद्ध व पसरलेले आहेत, तर प्रथमच खूप कालांतरानंतर ह्या आपल्या चाळीसगाव शहरात शिवरायांचा स्मारकाची निर्मिती ( उभारण्यात ) करण्यात आली,पण ते स्मारक उभारून जवळ जवळ १ वर्षाचा कालावधी लोटला गेला पण तिथले काही लाईटे , तिथली जे सुशोभीकरनाच्या वस्तू जसे उदा.- फर्शी , दरवाजे तिथे पाणी तुंबून ती घाण व निकामी होत आहेत महाराजांच्या स्मारकाला प्रकाश न मिळता ते अंधारात दिसत नाही, अजून अशी भरपूर कामे अपूर्ण दिसून येत असून त्यामुळे ते चाळीसगाव शिवप्रेमींना व खास करून स्वराज्य निर्माण सेनेच्या सैनिकांना जे दर रविवारी शिववंदना करत असता ते बघवत नाही,तरी आपण लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन आमच्या मागणीची अंमलबजावणी करावी व ते पूर्णतःवास न्यावे मनापासून व आदराने विनंती करत नगरपालिका प्रशासनास स्वराज्य निर्माण सेने तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी निलेश शांकट ,चेतन निकम ,राकेश पाटील,हर्षवर्धन गवळी,उमेश शांकट ,केशव थोरात ,सागर पवार आदी उपस्थित होते.