अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पुणे – सध्याच्या परिस्थितीत अनेक तथाकथित संस्था आणि संघटना अनेकांना ‘करोना योद्धा’ म्हणून डिजिटल प्रमाणपत्रे वाटत आहेत. यातील वाटणाऱ्या संस्था आणि सोयीस्कर स्वीकारणारे योद्ध्ये या दोन्हींच्या कामातील सत्यता आणि विश्वासहार्यता याबाबतीत अनेक शंका उपस्थित झालेल्या दिसतात.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनच्या काळात खरे योध्ये म्हणून काम करणारे डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत आणि सफाई कामगार आहेत. या सर्वांचा यथोचित सत्कार रूग्ण हक्क परिषदेने करावा, असे अवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याना केले आहे.
अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने गेली अनेक वर्षे “जागतिक डॉक्टर्स डे” निमित्ताने प्रातिनिधिक तत्वावर महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय सामाजिक कार्य केलेल्या डॉक्टरांना पुरस्कार आणि सत्कार समारंभ आयोजित केले जातात. यावर्षी डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार यांनी प्राणांची बाजी लावून केलेल्या कार्यास सलाम म्हणून सर्वांचे आभाराचे पत्र देऊन, गुलाब पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त करावी. बुधवार १ जुलै २०२० जागतिक डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
केंद्रीय कार्यालय सचिव दीपक पवार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खऱ्या करोना योद्ध्याना गौरवतील असे म्हटले आहे!