अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक यावर्षीचा पुरस्कार चाळीसगाव तालुक्यातील तीन आदर्श शिक्षकांना जळगाव येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिनांक 29 रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रोटान संघाच्या जळगाव येथील अधिवेशनात झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील हातले येथील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक रवींद्र प्रकाश पाटील व खडकी येथील अनुदानित आश्रम शाळेचे शिक्षक चंद्रकांत वसंतराव ठाकरे आणि अँग्लो उर्दू हायस्कुलचे शिक्षक अशपाक अहमद युसुब, ह्या तीन आदर्श शिक्षकांना जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान मिळालेल्या या पुरस्काराबद्दल या तीनही शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, प्रोटानचे राज्य अध्यक्ष गणेश काकडे, प्रोटॉनचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव तसेच संघटनेचे पदाधिकारी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.