दौंड तहसील प्रशासनाचा भोंगळ कारभार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,दौंड यांच्या आदेशाकडे कानाडोळा, शिस्तभंग कारवाईची मागणी

3 0
Read Time3 Minute, 13 Second


अधिकार आमचा न्यूज नेेेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव,हर्षल पाटोळे

दौंड,दि.१५/०३/२०२१ आपले सरकार सेवा केंद्र,(सेतू) तहसील कार्यालय, दौंड ता.दौंड जि. पुणे येथे  मिळकत प्रमाणपत्रा करिता ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणी करणे, आपले सरकार सेवा केंद्र,दौंड येथील व्यवस्थापकीय कामकाज शासन निर्णय मार्गदर्शक सुचना नुसार न होणे बाबत राजेश प्रभाकर बोर्डे यांनी दिनांक २८/१०/२०२० रोजी मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,दौंड यांजकडे लेखी  स्वरुपात तक्रार दाखल करणेत आली होती.
    तक्रारीची दखल घेऊन मा.तहसीलदार यांनी दिनांक २५/११/२०२० रोजी श्री.भानुदास येडे,महसूल अव्वल कारकून,दौंड यांस राजेश प्रभाकर बोर्डे यांनी या कार्यालयास सादर केलेल्या अर्ज अनुषंगाने सदर प्रकरणी अर्जाची सविस्तर चौकशी करून आपले स्वंयस्पष्ट अभिप्राया सह जाबजबाबा सह तपासणी करून अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा अशा आशयाचे पत्र देणेत आले. 
  दिनांक २५/११/२०२० रोजीच्या पत्र अनुषंगाने भानुदास येडे महसूल अव्वल कारकून यांजकडून दिनांक २५/११/२०२० ते २०/०१/२०२१ पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करणेत आली नाही. त्यामुळे व्यथित होऊन अर्जदार यांजकडून दिनांक २१/०१/२०२१रोजी वरीष्ठ स्तरावर तक्रार करणेत आली. तक्रार अर्जामध्ये महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ प्रकरण तीन मधील कलम ८ ते १२ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी बोर्डे यांनी केली.
  तक्रारीची दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी,पुणे तसेच उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर उपविभाग पुरंदर यांचे कार्यालय कडून सदर प्रकरणी शासकीय नियमानुसार रीतसर चौकशी करून अहवाल सादर करणेचे कळविण्यात आले आहे. 
   मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेश कनिष्ठ अधिकारी  जुमानत नाही? सूचनांचे अनादार करीत असलेचे दिसून येते? प्रकरणात दिसून येत आहे


  
  
 
  
   
   

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.