अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

दौंड:-सोलापुर जिल्ह्यातील सलगर वस्ती पोलीस स्टेशन सोलापुर शहर येथील कुख्यांत गुन्हेगार विनायक उर्फ बटल्या गौतम शिंघे वय 24 वर्ष हा जबरी चोरी करून वैजापुर मधुन पसार झाला होता. बरेच दिवस सोलापुर पोलीस त्यांच्या मागावर होते पण तो पोलीसांना गुंगारा देत होता. तरी दिं. 27/08/2020 रोजी तो दौंड येथे येणार असल्याची माहीती दौंड पोलीसांना मिळाल्याने तात्काळ पो.निरिक्षक श्री. सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शना खाली पो.हवा.श्री. असिफ शेख, पो.हवा. पांडूरंग थोरात, पो.कॉ.श्री.किरण राऊत,पो.कॉ.श्री.अमोल देवकाते,पो.कॉ.श्री अमोल गवळी, पो.कॉ.श्री.रवि काळे यांनी महाराणा हॉटेल जवळ सापळा रचुन त्याच्या मुसक्या आवळल्या. व पुढील कारवाई साठी सोलापुर शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदर कारवाई मुळे दौंड पोलीसांच्या कामगीरीवर दौंड मधिल जनता समाधान व्यक्त करत आहे. व वरीष्ठांनी सुध्दा शाबासकी दिली आहे