दौंड:आजची नाजूक परिस्थिती पाहता कोरोना वायरस ने जगभर हाहाकार माजवला आहे इटली,फ्रांस, इराक,चीन,अमेरिका,या प्रगतशील देशालाही हतबल केले आहे,प्रत्येक देश कोरोना वायरसपासून देशाची जनता कशी निरोगी राहिल यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.भारत देशही या कोरोना वायरसच्या विळख्यात अडकला आहे केंद्र आणि राज्यसरकार युद्धपातळीवर काम करत आहेत व उपाययोजना करण्यात वेळ खर्ची घालत आहे.महाराष्ट्रामध्येही रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत आहे.मुंबई,पुणे,बारामती,मालेगाव आणि अन्य जिल्ह्यामध्येही त्याचा प्रादुर्भाव मध्ये वाढ होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस,डॉक्टर,गटविकास अधिकारी, मुख्यधिकारी,व तालुका आरोग्य अधिकारी-डॉ अशोक राजगे व RH चे डीन डॉ. डांगे व सर्व सरकारी यंत्रणा स्वयंसेवी संस्था निस्वार्थ पणे काम करत आहेत.मुख्यता बाब म्हणजे पुण्याजवळील असणारे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका याठिकाणी अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही दौंड तालुक्यातील सर्व स्थानिक प्रशासन उदा:दौंड नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलिस, व अन्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.दौंडमध्ये एकही रुग्ण ना आढळण्याचे कारण म्हणजे सर्व प्रशासन पण पोलीस प्रशासनाची कामगिरी खूप अमूल्य आहे,जे योगदान पोलीस प्रशासन करत आहे ते अविस्मरणीय आहे जनसामान्यांना त्रास होऊ नये आपल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून कठोर निर्णय घेऊन कार्य करण्याचे जे जे सत्र चालवले आहे,कधी प्रेमाने तर वेळ पडल्यास काठी चा आधार घेत पोलीस प्रशासन दौंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांचे चेक पोस्ट वर कसून तपासणी करत आहे व त्यानंतर दौंडमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो.डी वाय एस पी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या कडक शिस्तीची अंमलबजावणी व पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता मोकाट फिरणाऱ्यावर कडक कारवाई केली जाते याच त्यांच्या कामगिरीमुळे दौंड शहर सुख समृद्धीत आहे.डी वाय एसपी ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा लेख माझ्या सर्व पोलीस बांधवाबद्दल असणाऱ्या कामगिरीला अर्पण.
कु:पवन गौतम साळवे अधिकार आमचा न्यूज पोर्टल चॅनल दौंड प्रतिनिधी-8390888681.हर्षल पाटोळे-8888741743