दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अल्पसंख्याक विभाग च्या वतीने रक्तदान शिबीर चे आयोजन

Read Time2 Minute, 6 Second

प्रतिनिधी(दौंड):-दि 27 करोना व्हायरसच्या साथीमुळे महाराष्ट्रात सध्याला रक्ताचा तुटवडा जाणवत आहे .महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे साहेब यांच्या आव्हानला प्रतिसाद देत दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज नवीन कोर्टाच्या जवळ लिंगाली रोड (प्रभाग 7) समर्थ नगर , पासलकर वसाहत दौंड जि. पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची आयोजन शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिन गायकवाड, विक्रम साबळे, अल्ताफ मुलानी यांनी मांडली होती. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकांचे जिल्हाध्यक्ष श्री. सोहेल खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीवनी ब्लड बँकेचे सोमनाथ सोनवणे,उपनगराध्यक्ष वसीम शेख सूर्यकांत गायकवाड,सोहन गायकवाड अजय काळे शैलेश उघाडे इ मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अल्ताफ मुलानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन गायकवाड, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे शहराध्यक्ष विक्रम साबळे यांनी केले. येणाऱ्या काळामध्ये शहरातील प्रत्येक प्रभागात रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे.
या शिबिरात एकूण 145 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मुख्यमंत्री मा:उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
Next post विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी HRDMinistry ने ३ मे रोजी होणारी NEETUG2020 परीक्षा पुढे ढकलली
error: Content is protected !!
%d bloggers like this: