धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच महामोर्चा-यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य

1 0
Read Time3 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)धनगर समाज महामोर्चा साठी उपविभागीय अधिकारी सासवड व तहसीलदार दौंड यांना निवेदन,किसन हंडाळ उपाध्यक्ष पुणे जिल्हा यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी पुढील महिन्यात 22 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जाती जमातीतील असलेल्या आरक्षणा ची अमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला यशवंत सेना,यशवंत छावा, यशवंत संघटना, यशवंत फाऊंडेशन, धनगर समाज क्रांती मोर्चा, एल्गार सेना,राजमाता अहिल्या ब्रिगेड, जय मल्हार सेना,धनगर साम्राज्य सेना,व महाराष्ट्र राज्यातील इतरही संघटना व विविध पक्षातील समाज बांधव सामील होणार आहेत. दौंड तहसीलदार व प्रांतअधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाला सूचित करण्यात यावे की,महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जमातीतील आरक्षण आहे. त्याच्या अमलबजावणी करण्यासाठी अनेक वर्षे न्यायासाठी लढा देतोय. परंतु या कडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करतंय, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीतील समावेशाची तरतूद केलेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,महाराष्ट्र राज्यात दोन कोटीच्या वर धनगर समाज आहे. हा आकडा शासनाला माहित नसावा जनगणना नाही, शासनाच्या या धोरणामुळे धनगर समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या 22 फेब्रुवारी 2022 रोजी मंत्रालयावर महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. निवेदनावर यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापूराव सोलनकर,पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन हंडाळ, दिपज्योती पतसंस्था अध्यक्षा ज्योती हंडाळ,हौसा टेगले,श्रीकृष्ण डुबे,शेवंता कोपनर,गौरव हंडाळ, सोहम कोपनर,सौरव हंडाळ, सुरज कोपनर यांच्या सह्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.