अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संविधान दिवस व अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त नॅशनल दलित मूव्हमेट फॉर जस्टीस च्या वतीने दौंडमध्ये दिं.11 डिसेंबर 2021 रोजी संविधान दिन व गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अँड. बि.जी.बनसोडे (ज्येष्ठ अधिक वक्ता मुंबई उच्च न्यायालय तथा विशेष सरकारी वकील रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड) हे होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अँड. केवलजी उके राज्य (महासचिव तथा मंत्रालय सदस्य राज्यस्तरीय मार्गदर्शक समिती महिला व बालविकास विभाग) हे होते या कार्यक्रमाचे उद्घाटन विनोद घुगे (पोलीस निरीक्षक दौंड) यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते (सचिव महाराष्ट्र राज्य एन डी एम जे) श्री पी एस खंदारे (सहसचिव महाराष्ट्र राज्य )अँड.अमोल सोनवणे, (विशेष सरकारी वकील जळीत प्रकरण उस्मानाबाद,एन डी एम जे) अँड.बापू शीलवंत (पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागार) पंचशीला ताई कुंभारकर (राज्य महिला संघटक) श्री.अनिरुद्ध पुनवटकर (शेती तज्ञ तथा वरिष्ठ साहित्य) श्री.बंदिश सोनवणे,श्री. विनोद जाधव हे उपस्थित होते. 2020/21 शैक्षणिक वर्षामध्ये दहावी बारावी मधील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.भारतीय संविधान व त्यातील प्रमुख तरतुदी मार्गदर्शक तत्वे,कर्तव्य याचे सखोल मार्गदर्शन ऍड.बी.जी. बनसोडे यांनी केले तर ऍड.अमोल सोनवणे यांनी संविधानाची वैशिष्ट्य सांगून संविधानामुळेच देश एकसंध असल्याचे सांगितले ऍड.बापूसाहेब शिलवंत यांनी मानवाधिकार दिनाचे महत्व सांगून संयुक्त राष्ट्र संघाचा जाहीरनामा व विशेष तरतुदी स्पष्ट केल्या ऍड.डॉ.केवळजी उके यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात भारतीय संविधान,तरतुदी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन कार्यकर्त्यांनी येणाऱ्या अडचणी संघटनेने मागील 15 वर्ष केलेल्या कामाचा तपशील सांगून तरुणांनी संघटनेत येण्याचे आवाहन केले.
तसेच दौंड मधील पिंकू झेंडे सदाशिव रंधवे प्रकाश सोनवणे, अँड.अजय डेंगळे, व काही युवकांनी नॅशनल दलित मुव्हमेट फॉर जस्टिस या संघटने मध्ये प्रवेश केला.
श्री.अँड.केवलजी उके यांची मत्रालय सदस्य राज्यस्तरीय मार्गदर्शक समिती वश्री.वैभव गिते जातीय अत्याचारात खुन झाल्याने उध्वस्त झालेल्या 17 अत्याचार पिडीत कुंटुबातील व्यक्तींना पाच हजार रूपये पेन्शन चालू करून दिल्याबद्दल तसेच अमोल सोनवणे यांची विशेष सरकारी वकील म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील जळीत प्रकरणात नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला अशी माहिती आयोजक दादासाहेब शिवाजीराव जाधव (नॅशनल पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक) यांनी दिली या कार्यक्रमाला पांडुरंग पाडेकर (एन डी एम जे पुणे जिल्हा निरीक्षक) विकास रंधवे सदाशिव रणदिवे, पिंकू झेंडे, प्रकाश पारदासानी, तसेच एन एम जी च्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता