अधीकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 8 ऑक्टोबर 2020 गुरुवार रोजी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी पालिकेच्या कामकाजा संबंधित आढावा बैठक आशालता चव्हाण ,मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांची उपस्थिती.पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही या कारणामुळे आलेली मरगळ दूर करीत पालिका प्रशासनाने झोकून कामाला सुरुवात करून शहर वासियांचे हिताच्या कामांना प्राधान्याने संपवा.जनतेच्या तक्रारी मार्गी लावा.मंजूर योजनांचा पाठपुरावा करा अडचण असल्यास मला सांगा यापुढे शहरवासीयांच्या हिताची कामे प्राधान्याने संपवा असे आदेश आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या, समांतर पाणी पुरवठा, भुयारी गटार योजना, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण यासह अकरा योजनांबाबत सविस्तर आढावा बैठक आज खासदार उन्मेश दादा पाटील जनसेवा कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण , पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे , पालिका अभियंता विजय पाटील ,नगर परिषदेचे गटनेते संजय आबा पाटील, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सुमारे दोन तास नगरपालिकेच्या विविध योजनांबाबत बैठक घेतली या बैठकीत सविस्तर माहिती घेऊन योजनांचे आजची परिस्थिती व पुढील दिशा ठरवून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या सर्व योजना तातडीने मार्गी लावा असे आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.