अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
चिंचवड(प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम
परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने
अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे.
मोशीतील डीपी रस्त्याने बाधित चार अनधिकृत बांधकामे
भुईसपाट करण्यात आली आहेत.
मागील 15 दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. मंगळवारी ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय एकूण 4 अनधिकृत बांधकाम असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 566 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आली आहेत. एक पोकलेन , एक जेसीबी , 10 मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त अजित पवार , सह शहर अभियंता मकरंद
निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे
यांच्या नियंत्रणात उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता,
बीट ऑफीसर यांच्या पथकाने कारवाई केली.