अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव – तालुक्यात ढगीफुटीमुळे शहर व तालुक्यात पावसाने अतोनात नुकसान केल्याने त्यात गुरे,घरे वाहुन गेले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोकडे गावाला लागून असलेल्या डोगरी नंदीला पुर आल्याने नंदी काठावर आदिवासी कुंटुंबाची घरे व संसाराचे साहित्य वाहून गेल्याने आदिवासी कुंटुंबाना दि १ रोजी रोकडे तांडा येथील शाळेत रयत सेनेच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करून मदत करण्यात आली
डोगरी व तितूर नंदीला पुर आल्याने चाळीसगाव शहरातील नदी किनाऱ्यावर असलेल्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतीवृष्टी झाल्याने ग्रामीण भागात शेकडो पशुधन मृत्यूमुखी पडले तर शेत व घरांचे अतोनात नुकसान झाले असून अशा संकटप्रसंगी रयत सेनेच्या वतीने तालुक्यातील रोकडे तांडा येथील जि प शाळेत वास्तव्यास असलेले आदिवासी कुंटुंबाना दि १ रोजी ब्लॅंकेट वाटप करून बाधीत कुंटुंबाला उब देण्याचे काम केले असल्याचे रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी ब्लॅंकेट वाटप प्रसंगी केले आहे. याप्रसंगी रयत सेना प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ (संता पैलवान), प्रदेश कार्याध्यक्ष सुमित भोसले, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,रोकडे ग्रा. प. उपसरपंच व रयत सेना अध्यक्ष अमोल पाटील ,उद्देश शिंदे ,मनोज भोसले आदी उपस्थित होते