
पोलीस निरीक्षक के के पाटील यांचे निलंबन व्हावे वारकरी संप्रदायाचे टाळ, मृदुंग आंदोलनद्वारे मागणी….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव- चाळीसगाव शहरातील हनुमंत सिंग राजपूत नगर मधील सप्तशृंगी माता मंदिरपरिसरात कीर्तन सप्ताह सुरु होता.27 एप्रिल रोजी कीर्तन सुरु असतांना पोलीस निरीक्षक के.के पाटील यांनी बूट घालून नारदाच्या गादीवर पाय ठेवले तसेच कीर्तनकार राम महाराज यांना धमकी दिल्याचा आरोप कीर्तनकरांनी केला होता.या प्रकरणी पोलीस निरीक्षक के. के पाटील यांचा राज्यभर निषेध करण्यात आला.राम कृष्णा पाटील यांनी के.के पाटीलांविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे फिर्याद देऊन तक्रार दिली होती.
नारदच्या गादीचा अपमान आणि कीर्तनकारांना धमकवल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक के.के पाटील यांचे निलंबन व्हावे अशी मागणी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प जळकेकर महाराजांनी केली होती.सात दिवसात निलंबन झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.मुदत संपूनही पोलीस विभागाने पोलीस निरीक्षक के.के पाटीलांचे निलंबन केले नसल्याने दि 9 एप्रिल सोमवार रोजी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज,कृष्णा महाराज त्याच बरोबर जिल्हाभरातील कीर्तनकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ, मृदुंग आंदोलन केले.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10वाजता टाळ, मृदुंग आंदोलनाला सुरवात झाली.जिल्हाभारतील तसेच जिल्हाबाहेरील असंख्य कीर्तनकार या आंदोलना प्रसंगी उपस्थित होते. जळगावचे आमदार राजू मामा भोंळे यांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.जो पर्यंत पोलीस निरीक्षक के.के पाटील यांचे निलंबन होतं नाही तो पर्यत आंदोलन सुरु राहील तसेच वरिष्ठ अधीकारी व मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वर जळकेकर महाराज व कृष्णा महाराज यांनी दिला आहे.
Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
Average Rating