अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)- आज दि 13 डिसेंबर 2021 रोजी धुळे – चाळीसगाव मेमू रेल्वे सेवेचा शुभारंभ चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी नारळ वाढवून केला शुभारंभ.
कोरोना मुळे बंद असलेली धुळे चाळीसगाव रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी पाठ पुरावा करत पुन्हा सेवा सुरू करण्याची मागणी केली होती पाठपुराव्यास आज रोजी रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिला मेमू ट्रेन म्हणजेच मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट सेवा सुरू करण्यात आली रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे,खासदार सुभाषजी भामरे,खासदार उन्मेष पाटील यांनी ऑनलाईन कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदविला.यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्यासह,चाळीसगांव चे आमदार मंगेश चव्हाण, धुळे शहर आमदार फारुख शाह, धुळे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगांव नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण, रेल्वेचे अधिकारी, रेल्वे प्रवाशी संघटना पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी भोरस पर्यंत प्रवास करत मेमु ट्रेन ला नारळ वाढवून शुभारंभ करत हिरवा झेंडा दाखविला, .
मेमु ट्रेन म्हणजे काय
मेमू ट्रेन म्हणजेच मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट या मेमु ट्रेन मधील प्रत्येक डब्याला वेग देण्यासाठी मल्टिपल युनिट विभागलेले असतात त्यामुळे ही ट्रेन इतर इंजिन असलेल्या ट्रेन पेक्षा तात्काळ वेग धारण करते व कमी वेळात थांबते देखील. ताशी अंदाजे स्पीड हा 110 ते 130 किलोमीटर प्रतीतास इतका असू शकतो. इतर ट्रेन सारखे इंजिनला शटिंग करावे लागत नाही. अशा प्रकारच्या ट्रेन्स ह्या शहरी व उपनगरीय भागांना जोडण्यासाठी कमी व मध्यम अंतराच्या स्टेशन साठी उपयोगी असतात. मेमू ट्रेन चा दररोज मेंटेनेस करण्याची गरज नसते तो दर पंधरा दिवसांनी केला जातो. त्यामुळे वेगळ्या पिट लाईन चा खर्च वाचतो. डब्याची रचना ही आपण चालत्या गाडीत पहिल्या बोगी पासून ते शेवटच्या बोगी पर्यंत जाऊ शकतो. पहिली मेमू ट्रेन ही 15 जुलै 1995 रोजी असंसोल आदरा या भारतीय रेल्वेच्या सेक्शनमध्ये धावली.