प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित धोरण जाहीर करून बदली प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी-गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ

1 0
Read Time6 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)- श्री गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ म्हणाले की, covid-19 च्या कारणामुळे सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या होऊ शकल्या नाहीत .त्यामुळे अनेक शिक्षक आपल्या कुटुंबापासून दुर राहून ,काही दुसऱ्या जिल्ह्यात राहून नोकरी करत आहेत .बदल्यांना उशीर झाल्यामुळे शिक्षकांची गैरसोय होत आहे .शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने नवीन सुधारित बदली धोरण (ऑनलाईन बदली प्रक्रिया ) जाहीर करून बदल्यांची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे , ‘बदली प्रक्रिया लांबवा आणि बदली थांबवा’ हेच गतवर्षी प्रमाणे होईल का ? अशी शंका शिक्षक वर्गात व्यक्त होत आहे, सर्व शासकीय विभागातील बदल्या वेळेत होतात पण शिक्षक संवर्गाबाबत दरवेळी बदल्यामध्ये का उदासीनता दिसून येते ? यासाठी महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे बदली धोरणात काही बदल सुचविले आहेत . याबाबत दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी मा. हसन मुश्रीफसाहेब ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहाय्यक श्री खैरेसाहेब व श्री पाटील एम बी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून बैठकीसाठी वेळ मिळावी याबाबतचे निवेदन सादर केले आहे .त्या निवेदनामध्ये बैठकीत चर्चा करायचे विषय सविस्तरपणे मांडले आहेत .
तसेच 16 डिसेंबर 2020 रोजी मा. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफसाहेब यांची याविषयासंदर्भात भेट घेतली आहे . त्यावेळी मंत्रीमहोदयांनी त्यांचे स्वीय सहाय्यक पाटील साहेबांना संघटनेसोबत मीटिंग लावण्याची सूचना केली .परंतु आज तागायत मीटिंग लावण्यात आली नाही .या निवेदनाद्वारे नम्र विनंती आहे की संघटनेला बैठकीसाठी वेळ द्यावा व राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे .
त्यातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे- प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित धोरण जाहीर करून बदली प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी .
राज्य सरकारचे इतर विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये मूलभूत फरक आहे . त्यामुळे विशेष बाब म्हणून प्राथमिक शिक्षकांना एमएससीआयटी उत्तीर्ण होण्यासाठी डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी . काही शिक्षक उशिरा एमएससीआयटी झालेले आहेत परंतु त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम झालेला नाही .त्यांच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात येऊ नये .प्रत्येक शाळेत आपल्याकडे संगणक व संगणक लॅब उपलब्ध नाही त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना एमएससीआयटी उत्तीर्ण होण्यासाठीची मुदतवाढ डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात यावी .
दुर्गम भागातील व कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत .
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करावी .
दुर्गम क्षेत्र ३ वर्षे व सुगम क्षेत्रात ५ वर्षे सेवा विनंती बदलीसाठी ग्राह्य धरण्यात यावी.
प्रत्येक शिक्षकाची एका शाळेवर कमीत कमी ५ वर्षे सेवा व्हावी. एका शाळेवर ५ वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या सुगम क्षेत्रातील शिक्षकांना बदली पात्र समजण्यात येऊ नये.
इतर महत्त्वाचे मुद्दे यापूर्वीच्या निवेदनात आपणास सादर केलेले आहेत .
प्रस्थापित संघटनांच्या या सहा महिन्यात आपणासोबत अनेक वेळा बैठका झालेल्या आहेत .परंतु आमची संघटना मागासवर्गीय शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत असून गेली सहा महिन्यापासून बैठकीसाठी वेळ मिळावा म्हणून निवेदन सादर करीत आहोत परंतु अद्याप बैठकीसाठी वेळ मिळाला नाही . संघटनेच्या या निवेदनाचा सहानभूतीपूर्वक विचार करून बैठकीसाठी वेळ द्यावा अशी विनंती ग्रामविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .या निवेदनाच्या प्रती मा .उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा .अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा .राहुलदादा कुल आमदार दौंड विधानसभा
मा .प्रधान सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती श्री गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी माहिती दिली .

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.