अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील टाकळी प्र. चा येथे ए टी एम पिन तयार करून देण्याचा नावाखाली अज्ञाताने विवाहतेची केली फसवणूक खात्यातून 49 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि 11 डिसेंबर रोजी झाली असून अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
एनी डेस्क नावाचे अप्लिकेशन एका मोबाइल किंवा लॅपटॉप वरून दुसऱ्या मोबाइल किंवा लॅपटॉप ला ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे अप्लिकेशन असून कोणाच्या सांगण्यावरून सदर अप्लिकेशन डाऊनलोड करू नये तसेच आपली बँके संबंधित खासगी माहिती जसे पिन नंबर,ए टी एम नंबर,सी व्ही व्ही नंबर,ओ टी पी सारखी गोपनीय माहिती न देता काही बँके संबंधित काम किव्वा तक्रार असल्यास बँकेच्या जाऊन करावे-चाळीसगांव शहर पोलीस निरीक्षक के के पाटील
एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील वंदना विजय पाटील (वय-४३) या विवाहितेला ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते
१२:१५ वाजताच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (मो. ७८६६९९२३१८) एटीएम पिन तयार करून देतो असे सांगत सर्व माहिती घेत एनी डेस्क नावाचे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत ऑनलाईन 49 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याची घटना तालुक्यातील टाकळी प्र.चा
येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. वंदना विजय पाटील
यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे भादवी कलम-४२० व आयटी ऍक्ट ६६ (सी) प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास
स्वत पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे करीत आहेत.