अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र माइनॉरिटी ऐनजीओ फोरम आणि नई राह फाऊंडेशन तर्फे अल्पसंख्याक हक दिनानिमित्त अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध योजनांबाबत जणजागृती करण्यात यावी अश्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन,
दरवर्षी प्रमाणे शासननिर्देशानुसार दि.18 डिसेंबर हा अल्पसंख्याक हक दिन शासनामार्फत साजरा करणेचे नियोजन असते.परंतु कधीही या दिनाचा चांगला कार्यक्रम घेतला जात नाही,मुख्यतः अल्पसंख्याक समाज हा मागासलेला समाज आहे,या समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक मंत्रालय,अल्पसंख्याक आयोग, वक्फ बोर्ड ,मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ राज्यस्तरावर कार्यरत आहेत,परंतु अल्पसंख्याक विकास योजना,पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम या योजना जिल्हास्तरावर राबवणेची जबाबदारी अल्पसंख्याक विभाग शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीची आहे,मात्र ही जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत योग्य क्षमतेने राबवली जात नाही,परिणामी अल्पसंख्याकाचे विकासाबाबत अनेक प्रश्न ,समस्या उदभवतात,या समस्याबाबत हक्काची मागणी करणेसाठी 18.डिसेंबर हा अल्पसंख्याक हक दिन मा,जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत जिल्हास्तरावर अल्पसंख्याक विकास सनियंत्रण समिती सदस्यासोबत साजरा करणे आवश्यक आहे,अल्पसंख्याक योजना जनजागृती जिल्हाभर व्हायला हवी,अल्पसंख्याक विकासाचा आढावा घेणेत यायला पाहीजे,परंतु असे काही घडुन येत नाही,व अल्पसंख्याक समाजाला विकासापासुन वंचितच ठेवले जाते,म्हणुन विवीध सामाजिक संस्थाचे सहभागातुन हक माँगो अभियान राबवत 1) या वर्षाचा 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक दिन आपले कार्यालयामार्फत चांगल्या पद्धतीने सोशल डिस्टन्सचे पालन करित आॕफलाईन पद्धतीने च व्यापक प्रमाणात साजरा व्हावा. 2) जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीचे सर्व शासकिय सदस्य व मा.लोकप्रतिनिधी सदस्य यांना अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रमास निमंत्रीत करावे.3) चालु वर्षातील झालेल्या अल्पसंख्याक विकासाचा आढावा घेवुन अहवाल जनतेसाठी प्रसिद्ध करावा,सामाजिक संस्थाना माहीतीपर द्यावा.4) जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समीतीतील अशासकिय सदस्य नियुक्ती त्वरित होणेकामी नियोजन करावे.5) पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्राधान्याने व्हावी.6) हक माँगो अभियानाद्वारे केलेल्या मागण्याबाबत मंत्रालय स्तरावर अल्पसंख्याक विकासाबाबत उपाययोजना होणेबाबत पत्रव्यवहार करावा. अल्पसंख्याक हक दिवस साजरा करणेसाठी रु.2 लाख ची तरतुद प्रत्येक जिल्ह्याला करावी अशी मागणी मंत्रालयाकडे करावी.7) अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीच्या तिमाही बैठका नियमित व्हाव्यात व या बैठकासाठी मा.खासदार,आमदार, अल्पसंख्याक लोकप्रतिनिधी तसेच अल्पसंख्याक समाजातील सामाजिक संस्थना निमंत्रीत करावे 8) जिल्हास्तरावर स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभाग सुरु व्हावा. 9) हक माँगो अभियानातील मागण्यानुसार जिल्हास्तरावर चांगल्या उपाययोजना कराव्यात.10)मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जागा उपलब्ध करुन द्यावी. 11)जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक पतपुरवठा धोरणामध्ये अल्पसंख्याक कोटा निश्चीत करुन याबाबत 100% उद्दिष्टपुर्ती झाली पाहीजे. 12) जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीवरील अशासकिय सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी. 13) अल्पसंख्याकांचे हक्क व अधिकार बाबत व्यापक जनजागृती व्हावी,
अश्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र माइनॉरिटी ऐनजीओ फोरम आणि नई राह फाऊंडेशन तर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले निवेदनावर नई राह फाउंडेशन अध्यक्ष शेख जहीर शेख सलीम,वसीम शेख हनीफ,नाज़िम शेख सलीम,जावीद खान,शोएब भाई,शेख मज़हर सकुर आदींच्या सह्या आहेत