चाळीसगाव (प्रतिनिधी)-संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स मधील ठेवीदारांचे शिष्टमंडळ आज खासदार उन्मेश पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी बोलतांना सांगितले की महाराष्ट्रभरातून तसेच देशभरातून विशेषतः जळगाव जिल्हा तसेच चाळीसगाव तालुक्यातून गोरगरीब तळागाळातील सर्वसामान्य जनतेचे कोट्यावधी रुपये ओरिसा येथील मायक्रो फायनान्स या कंपनीने गोळा करून परतावा दिलेला नाही, म्हणुन हजारो खातेदार संभाजी सेनेच्या माध्यमातून गेल्या काळात विविध आंदोलने केली मुंबई येथील आझाद मैदानावर देखील आंदोलन केले होते त्यावेळी संबंधित्यांना अटकही करण्यात आली होती परंतु हा विषय देशपातळीवरचा असल्याने आपण केंद्र सरकार तसेच केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून योग्य ठिकाणी आमचे गाऱ्हाणे मांडावे आणि सर्वसामान्य लोकांना आपल्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन घेऊन शिष्टमंडळ गेले असता खासदार उन्मेश पाटील यांनी सकारात्मक अशी सविस्तर चर्चा केली यावेळी विशेषत भुवनेश्वर कोर्टाने दि.२९/०६/२०१७ मध्ये कंपनिला खातेदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत, त्या आदेशाची प्रतही खासदार साहेबांनी सविस्तर वाचली तसेच केंद्रीय यंत्रणा येथील संबंधित काही लोकांशी बोलून तसेच मायक्रो फायनान्स चे मुख्य कार्यालय भुवनेश्वर येथे आहे, त्यामुळे त्यांनी तेथील खासदार महोदयांशी देखील संपर्क साधून पुढील कारवाई संदर्भात दिशा ठरली असून शिष्टमंडळाला यांनी शब्द दिला की संबंधित ज्या ज्या यंत्रणेशी संपर्क साधावा लागेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जे जे शक्य आहे, त्या माध्यमातून नक्कीच आपण देशभरातील लाखो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये मिळवून देण्याकरता पूर्णतः प्रयत्न करू. खासदार उन्मेश पाटील यांनी दिलेल्या शब्दामुळे नक्कीच लाखो लोकांना न्याय मिळेल असा असा विश्वास आणि अपेक्षा ठेवीदारां मध्ये निर्माण झाल्या आहे, या वेळी शिष्टमंडळामध्ये संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्यासोबत तालुका प्रवक्ता दिवाकर महाले, कार्यालय प्रमुख आधार महाले, प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार रणधीर जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Read Time3 Minute, 45 Second