राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधुन केसरी शिधापत्रीका धारकांना लाभ द्यावा-चाळीसगांव शहर महिला काँग्रेस

2 0
Read Time3 Minute, 59 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 11 फेब्रुवारी शुक्रवार रोजी शहर महिला काँग्रेस तर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधुन केसरी शिधापत्रीका धारकांना अन्नधान्य मिळण्याबाबत नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना निवेदन देण्यात आले.

अन्न सुरक्षा योजनेचा १० रूपय किंमत असलेले फार्म तहसील कार्यालयाच्या आवारात गरजूंना महिला काँग्रेस तर्फे मोफत वाटण्यात आले,असून लवकरात लवकर गरजूंनी आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून शहर महिला काँग्रेस कार्यालय महालक्ष्मी नारायणवाडी उमा पेट्रोल पंप शेजारी येथे जमा करावे-चाळीसगांव शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना ताई पोळ


निवेदनात म्हटले आहे की केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खाद्यतेल LPG गॅस जीवनावश्यक वस्तुचे भाव गगनाला भिडलेले आहे.त्यामुळे चाळीसगांव शहर व तालुक्यातील गोर-गरीब, मध्यवर्गीय जनता ही या महागाई मध्ये भरडली जात आहे. महागाईचे चटके हे सर्व सामान्य जनतेला सोसावे लागत आहे. रेशनवरील केसरी शिधापत्रीका धारकांना सद्या अन्न-धान्य मिळत नसल्यामुळे केसरी शिधापत्रीका धारक व शिधापत्रीका नसलेल्या गोर-गरीब, आर्थिक दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, राष्ट्रीय अन्न-सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी किचकट शासकीय प्रक्रीया दुर करून ज्यांच्याकडे केसरी शिधापत्रीका आहेत. ज्याचे आर्थिक उत्पन्न कमी आहे.
ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे, अशा आर्थिक दुर्बल, अशिक्षित, नागरीकांचा आर्थिक गरीब परिस्थितीमुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा १० रूपयांचा फॉर्म भरणे देखील शक्य होत नाही. हे नागरीक अशिक्षित असल्यामुळे तसेच येणाऱ्या इतर अडचणी लक्षात घेता तहसिल कार्यालयाने या सर्व गोष्टी विचारात घेवून एकाच ठिकाणी एकाच वेळी केसरी शिधापत्रीकेवर सही शिक्के मारून या योजनेचा सर्व सामान्य गोर गरीब जनेतला लाभ मिळावा असे प्रयत्न करावे.

निवेदन देतांनी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा अर्चनाताई पोळ,माजी आमदार ईश्वर जाधव,जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी,माजी युवक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र पोळ,अल्ताफ खान,मंगेश अग्रवाल,निलेश भडक,युवक तालुका अध्यक्ष मधू गवळी,सुधाकर कुमावत,जमील शेख,कुसुम ताई खरटमल, अकिल मुजावर,गंगा ताई खरटमल,संगीता ताई देशमुख,जयश्री ताई देशमुख,मीना ताई मोरे,सरिताताई खरात,नामदेव चंदनशिव,भालचंद्र शिंदे,रामेश्वर कासार,राधा ताई गायकवाड,संदीप सोनार महिला काँग्रेस व काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.