रेल्वे अपघातात मृत्यू ओळख पटविण्याचे दौंड शहर पोलिसांचे आवाहन

3 0
Read Time2 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दि. १८ मार्च रोजी 10 वाजेच्या सुमारास गार ता. दौंड जि पुणे गावचे हद्दीत रेल्वे मेन लाईन कि. मी. नंबर २५९/२-३ चे मध्ये एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे नाव पत्ता माहीत नाही. हे रेल्वे अपघातात रूळाचे बाजुला पडुन जखमा होवुन मयत स्थितीत आढळुन आलेले आहे.
त्याबाबत दौंड पोलीस स्टेशनला मयत रजिस्टरी दाखल करण्यात आलेले आहे. सदर मयत अनोळखी इसमाचे सविस्तर वर्णन :-एक अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे नाव, पत्ता माहीत नाही. मयताची उंची अंदाजे ६ फुट, डोकीस काळे पांढरे केस दिसत असुन ते रक्ताने
माखलेले आहेत. मयताचे अंगात नेसणीस हाफ बाहयाचा पांढ-या रंगाचा शर्ट, तांबडया रंगाचे बनियन, खाकी रंगाची पॅन्ट,तांबडया रंगाची व्हिनस कंपनीची अंडरवियर, पायात सॅन्डल दिसत आहे. रेल्वे अपघातात मयताचे डोक्याचे उजवे बाजुला मोठी जखम झाली असुन, कवठी फुटुन मेंदु बाहेर आलेला दिसत आहे. मयताचे तोंडावर, डावे हाताचे मनगटावर, उजवे पायाचे खाली, दोन्ही पायाचे गुडघ्यावर तसेच नडगीवर खरचटलेले दिसत आहे. डावे हाताचे मधील दोन्ही
बोटांमध्ये जखम झालेली दिसत आहे. उजव्या पायाचे करंगळीचे बोट सोडुन इतर ४ बोटे जुने तुटलेली दिसत आहेत. मयताचे कमरेला ४ पदरी काळे रंगाचा
करदोडा दिसत आहे.तरी वर नमुद अनोळखी मयत इसमास वरील वर्णनावरून ओळख पटल्यास किव्वा कोणी नातेवाईक असेल तर दौंड शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले असून सदर मयताचा पुढील अधिक तपास पोलिस निरिक्षक श्री. विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली महेंद्र गायकवाड सहा. पोलीस उपनिरिक्षक हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.