अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी हर्षल पाटोळे
दौंड,दि.24/09/2020 (दौंड प्रतिनिधी: हर्षल पाटोळे ) कामाची माहिती व्यापक प्रसिद्धीच्या दृष्टीने जनतेस सहजरीत्या उपलब्ध करून देणे तसेच कामामध्ये पारदर्शीपणा असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने विकास कामांचे माहिती दर्शक फलक लावणे शासन नियम आदेशा नुसार बंधनकारक असताना दौंड नगरपालिका ठेकेदारांन कडून मात्र शासन आदेशाचा अवमान केला जात आहे. या बाबत दौंड नगरपालिका प्रशासना कडून मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई दौंड नगरपालिका ठेकेदारांनवर करताना आढळून येत नाही.दौंड नगरपालिका हद्दीत सद्यस्थितीला विविध विकास कामे सुरु आहेत. विकास कामे सुरु असताना कामाच्या ठिकाणी विकास कामांचे माहिती दर्शक फलक लावणे बंधनकारक आहे या बाबत नागरिकांन कडून वारंवार विचारणा केली जात आहे. विकास कामांचे माहिती दर्शक फलक लावलेले नाही ही बाब नगरपालिका प्रशासनास निदर्शनास आली असता दिनांक 12/02/2020 रोजी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी कार्यालयीन आदेश काढून सर्व विभाग प्रमुखांना आदेशित केले की, दौंड नगरपरिषद मार्फत सुरु असलेल्या विकास कामांचे फलक लावणे हे प्राधान्याने पुर्ण करुन तसा अहवाल सात दिवसात सादर करावा जे विभाग प्रमुख आदेशा नुसार कार्यवाही करणार नाही अशा विभाग प्रमुखां विरुद्ध शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाईकरण्यात येईल अशा आशयाचे कार्यालयीन आदेश असताना देखील संबधित विभाग प्रमुखांनी, ठेकेदारांन कडून फलक लावणे बाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच मुख्याधिकारी यांनी संबधित विभाग प्रमुखांनवर आदेशाची अंमलबजावणी न होणे बाबत
कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
नागरिकांच्या मौखिक/लेखी स्वरुपात तक्रारी येत असताना मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिनांक 14/08/2020 रोजी कामांचे ठिकाणी माहिती दर्शक फलक लावणे बाबत नगरपालिका ठेकेदार बांधकाम विभाग, 17 ठेकेदारांना पत्र काढण्यात आली, या पत्रामध्ये असे म्हटंले आहे की, चालू असलेले कामांचे माहिती दर्शक फलक शासन नियमानुसार दोन दिवसात बसविणेत यावे व माहिती दर्शक फलक जिओ टँगिग द्वारे फोटो काढून कार्यालयात सादर करावा अन्यथा नगरपरिषद आपले बिलातून सदर रक्कम कपात करुन माहिती दर्शक फलक बसविणेचे कार्यवाही करेल याची सक्त नोंद घ्यावी. अशा प्रकारची सक्त ताकीद देऊन देखील अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेचे निदर्शनास येत नाही.
मुखयाधिकारी मंगेश शिंदे यांची बदली झाल्यामुळे नव्याने पदभार स्विकार करणारे मुख्याधिकारी सौ.निर्मला राशिनकर दौंड नगरपालिकेचा कारभार पारदर्शी आणि लोकाभिमुख होणे कामी संबधित विषया कामी कोणती कारवाई करणार या बाबत नागरिकांन कडून खुलासा मागितला जात आहे.