अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिना निमित्ताने दौंड मध्ये श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय या शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका श्री काजी मॅडम यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी उपाध्ये सर,सुपरवायझर सोनवणे सर, थोरात सर ,मांडगे सर तसेच सर्व शिक्षक स्टॉप उपस्थित होते यावेळी श्री थोरात सर,मांडगे सर व मुख्याध्यापिका समीना काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
तसेच दौंड शहरामध्ये युवकांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला युवकांनी मेणबत्ती लावून व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रकाश साळवे, विजय थोरात,शंकर व्हंकाडे, प्रवीण पोळ, अनिकेत रणसिंग, विजय जाधव(पत्रकार),दिपक पाटील, निलेश हराळ, हनुमंत मोसालगी,हीरामण कुगावकर,विशाल हेगडे आदी उपस्थित होते.