‘वी आर स्कॅवेंजरस्’ च्या निसर्गसेवकांनी केले वृक्ष रोपण,चिमुकल्यांचा पण हातभार….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-येडेवाडी, दौंड येथील “बिरोबा मंदिर परिसरात” ‘वी आर स्कॅवेंजरस्’ निसर्गसेवक ग्रुप, येडेवाडी ग्रामस्थ व वनविभाग दौंड यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.

‘वी आर स्कॅवेंजरस्’ च्या निसर्गसेवकांनी मागील तीन दिवसांपासून श्रमदान करून मंदिरा जवळ ५० खड्डे तयार केले होते. वनविभाग दौंड यांच्या मार्फत या कार्यक्रमासाठी मोफत वृक्ष पुरविण्यात आली.तसेच साबळे यांनी पाण्याचा टँकर मोफत दिला आला.दि 12 जून रोजी या कार्यक्रमात स्कॅवेंजरस् व येडेवाडी (लिंगाळी) येथील ग्रामस्थांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला तसेच चिमुकल्यांनी सुद्धा या उपक्रमात हातभार लावला एडवोकेट येदे यांनी ग्रामस्थ सर्वांचे आभार मानले व लावलेल्या सर्व झाडांची भविष्यात काळजी घेण्याची शपथ घेतली.
या वेळेस ‘वी आर स्कॅवेंजरस्’ ग्रुपचे निसर्गसेवक, जय मल्हार ग्रुप व येडेवाडीतील ग्रामस्थ व युवकांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.