अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

भाजपचे राज्यसभेतील सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करू नये असे सांगितले असता या बाबत दौंड येथे जाहीर निषेधाचे निवेदन दौंड तहसिदार यांना शिवसेना दौंड शहर यांच्या वतीने देण्यात आले.
अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत तरी राज्यसभेत शपथविधीच्या वेळेस नवनिर्वाचित खासदार यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करू नये असे भाजपाचे खासदार सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सांगितले या गोष्टीमुळे अखंड भारत देशातील जनतेचा अपमान झाला आहे अशा नीच वृत्तीच्या लोकांचा शिवसेना दौंड शहराच्या वतीने जाहीर निषेध करून आज दिं.23/07/2020 रोजी दौड तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना आनंद पळसे (शिवसेना दौंड शहर प्रमुख), प्रसाद कदम (उपशहर प्रमुख दौंड) अजय कटारेे (उपशहर प्रमुख), नितिन सलमपुरे (उप शहर प्रमुख), दिपक चितारे (शाखा प्रमुख),अजित फुटाणे(विभाग प्रमुख). व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.