Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शहरात पुन्हा एम.पी.डी.ए. कायदा अंतर्गत कारवाई.सराईत गुन्हेगारास मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे केले स्थानबद्ध…

0 0
Read Time7 Minute, 42 Second

संपादक गफ्फार शेख

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

यापुढे भविष्यात अशा प्रकारचे सराईत गुन्हे करुन, चाळीसगांव शहराची शांतता भंग करणारे तसेच शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द मोक्का, एम.पी.डी.ए. व इतर कठोर कायद्यान्वये अतीशय कडक कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त दिवस कारागृहात स्थानबध्द करण्यात येईल.

संदीप पाटील पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पो.स्टे.

चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात पुन्हा एम.पी.डी.ए. कायदा अंतर्गत कारवाई.चाळीसगांव शहरातील वाजीदखान साबीरखान वय 23 वर्षे रा. नागदरोड, झोपडपट्टी,यास स्थानबंध्द करण्यात आले आहे

वाजीदखान साबीरखान याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. ला खुनाचा प्रयत्न- 01, गंभीर दुखापत- 03, साथीदारांना सोबत घेवुन दंगल करणे 01 असे एकुण 05 गुन्हे दाखल होते. तसेच नमुद इसमाविरुध्द वेळोवेळी प्रतीबंधात्मक कारवाई करण्यात येवुन देखील त्याच्या स्वभावात बदल न झाल्यामुळे त्यास सन 2021 मध्ये जळगाव व नाशिक जिल्ह्यातुन दोन वर्षाच्या कालावधीकरीता हद्दपार करण्यात आले होते.
दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वे सदरचा हद्दपार आदेश रद्द झाल्यानंतर लागलीच दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी नमुद इसमाविरुध्द चाळीसगांव शहरात कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 506 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यात त्या दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली होती.अश्या प्रकारचे गुन्हे करण्याची सवय असल्याने त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड संहीता व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता असे निर्देशनास येत होते. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसे-दिवस वेगवेगळया तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता.
त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन 1981 नुसार “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वाजीदखान साबीरखान याचे विरुध्द श्री सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक, पोना विनोद भोई, पोकॉ उज्वलकुमार म्हस्के यांच्या मदतीने चौकशी पुर्ण करुन दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव श्री एम. राजकुमार सो यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांनी मा. जिल्हादंडाधिकारी सो. जळगांव यांच्या कार्यालयात पाठविला होता.
दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी मा.जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडील आदेश क्रमांक दंडप्र./कावि/एम.पी.डी.ए./47/2023 जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जळगाव दिनांक 28 एप्रिल 2023 अन्वये एम.पी.डी.ए.कायद्यान्वये वाजीदखान साबीरखान वय 23 वर्षे रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगांव ता.चाळीसगांव याचे विरुध्द स्थानबध्दतेचा आदेश जारी केल्याने मा. श्री एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक, जळगांव, मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव व मा. श्री अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधिक्षक, चाळीसगांव विभाग यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील श्री सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना विनोद भोई, पोना भुषण पाटील, राहुल भिमराव सोनवणे,पोकॉ उज्वलकुमार म्हस्के, पोकॉ विजय पाटील, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र निंबा बच्छे अशांनी दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी सदर इसमास ताब्यात घेण्यात येवुन त्यास मध्यवर्ती कारागृह, येरवडा जि. पुणे येथे रवानगी करण्यात आलेली आहे.
यापुर्वी देखील सराईत गुन्हेगार नामे निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय 21 वर्षे रा. नारायणवाडी, चाळीसगांव याच्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करुन मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे. तसेच गुरनं. 485/2022 भादवि कलम 307 वगैरे प्रमाणे गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये देखील कारवाई करण्यात आलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: