अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
सचिन रनसिंग,मयूर साळवे
वाढता कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा जोमाने कार्य करत आहे,तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लोकांमध्ये आजून जागरूकता येणे गरजेचे आहे की लोक स्वतःची काळजी सुद्धा घेत नाही असा प्रश्न निर्माण होतो शासन नियमांचे पालन करने खूप गरजेचे आहे तरी काही लोक विना मास्क फिरतांना दिसत आहे अश्या निष्काळजी लोकांकडून दौंड नगरपालिकेने दंड वसुल करण्याचे कार्य सुरू केले आहे आज या कारवाईत 139 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यात मास्क ना वापरणारे,दुकानात सॅनिटाईजर न ठेवणारे व सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या लोकांचा समावेश आहे तसेच ज्यांच्या कडे मास्क आढळून आले नाही त्यांना मास्क वाटप करण्यात आले ही कारवाई दौंड शहराचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली झालेल्या कारवाई योग्य असल्याचे जागृत नागरिक चर्चा करत आहे.
