शिबिर नव्हे हा तर आरोग्याचा महायज्ञ,रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चा स्तुत्य उपक्रम 132 रुग्णांवर करण्यात आल्या विनामुल्य प्लास्टिक सर्जरी (शस्त्रक्रिया)

Read Time3 Minute, 2 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 8 मार्च 2020 रोजी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे आयोजित व एच एस पटेल कंपनी (श्री प्रवीण भाई पटेल) यांच्या दातृत्वा ने प्लास्टिक सर्जरी शिबिर मोठ्या उत्साहात व अत्यंत सेवाभावी वृत्तीने संपन्न झाले. यामध्ये एकूण 132 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यात चिटकलेले बोट, फाटलेले व दुभंगलेले ओठ, तसेच जळीत रूग्ण (Burn contractures) तसेच शरीरावरील गाठी, चेहऱ्यावरील व्रण तसेच कॉस्मेटिक सर्जरी यासारख्या शस्त्रक्रियांचा अंतर्भाव होता. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार देखील करण्यात आला. शब्दांमध्येच विचार करायचा झाल्यास साधारणतः 80 लाखां पर्यंत चा सर्व शस्त्रक्रियांचा खर्च या शस्त्रक्रियांना आला असता, जो या शिबिरा द्वारे विनामूल्य करून रुग्णसेवा देण्यात आली.
यावेळी पुण्याचे डॉ. पंकज जिंदाल (हॅन्ड सर्जन),मुंबई येथील डॉ. शंकर सुब्रमण्यम (कॉस्मेटिक सर्जन), डॉ. येलिकर औरंगाबाद, डॉ नोवेल ब्रिटो (पणजी)तसेच चाळीसगावातील नामांकित भूलतज्ञ डॉ. सुलभा साळुंखे, डॉ. कुणाल तलरेजा, डॉ श्वेता वाबळे, डॉ वाडेकर तसेच सर्जन डॉक्टर अमित जैन, डॉ सत्यजित पूर्णपात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ अमित जैन यांनी आपले हॉस्पिटल या शिबिरासाठी उपलब्ध करून दिले. रोटे. बलदेव पुंशी, रोटे. डॉ संदीप देशमुख, रोटे राजेंद्र कटारिया, रोटे मधुकर कासार, रोटे समकित छाजेड, रोटे बाळासाहेब सोनवणे, रोटे संजय चौधरी, रोटे सुभाष सराफ, संजय अग्रावत, नितीन पाटील तसेच इतर रोटरी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. गोरगरिबांना पर्यंत प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून त्यांचे दुःख वाटून तर नक्कीच घेता येत नाही, परंतु कमी करता येते व त्याचा खारीचा वाटा रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव नेहमीच उचलत असते असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप देशमुख यांनी सांगता समारोपाच्या वेळी व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post जागतिक महिला दिनानिमित्त दौंड येथील दौंड पोलिस स्टेशन येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल यांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा
Next post खासदार उन्मेष दादा पाटील व आमदार मंगेश दादा चव्हाण यांना चाळीसगांव जंक्शन रेल्वे प्रवाशी संघटने तर्फे सुपरफास्ट गाड्यांना चाळीसगांव स्टेशनवर थांबे देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
error: Content is protected !!
%d bloggers like this: