अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव-राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ख्याती असलेले ना गुलाबराव पाटील यांची शिवसेना प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे प्रमुख प्रवक्ते पदी खासदार संजय राऊत तर यांच्या सोबत खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोर्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती शिवसेना कार्यालयातून देण्यात आली. 10 प्रवक्त्यांमधे उत्तर महाराष्ट्रातून पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची निवड म्हणजे उत्तर महाराष्ट्रात पालकमंत्री यांचे अखंडित कार्य या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.