अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी) दि . 20/11/2020
महावितरण विज ग्राहकांकडुन थकबाकी वसुल होण्यास मद्दत होईल या साठी . महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.शेंडगे,अती कार्यकारी अभीयंता श्री.भेले व सहायक अभियंता श्री.उकलकर यांनी वार्ड क्रमांक 10 येथे विठ्ठल मंदिर परिसरात न.पा नगरसेवका सोबत बैठक घेतली.
या बैठकीत मार्च 2020 ते आजपर्यंत आम्ही महावितरण चे अधिकारी व कर्मचारी कोरोना च्या जागतिक महामारीच्या काळात कसलीही पर्वा न करता दिवसरात्र आपणास अखंडीत वीजपुरवठा व्हावा म्हणून कार्यरत होतो.या कालावधीत जसे आपल्या सर्वांच्या उत्पन्नामधे फरक पडला त्याच प्रमाणे महावितरण च्या उत्पन्नात देखील फार मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली.आपणास जाणीव आहेत की महावितरण सारख्या एवढ्या मोठ्या आस्थापनेला सुरळीत चालू ठेवणे करिता एका निश्चीत रकमेची मासिक गरज असते,ना नफा ना तोटा या तत्वावर चालत असताना कर्मचारी पगार, विज खरेदी, दैनंदिन संचलना साठी काही ठराविक रक्कम ही वेळेत आवश्यक असते.आपण नियमित विज बिल भरणा केला तरच वरिल बाबीसाठी नियोजन होणे शक्य आहे.परंतू कोरोना मुळे समाजातील सर्व घटकाच्या उत्पन्नात एक पोकळी निर्मान झाल्याने पर्यायाने विज बिल भरणा झाला नाही आणि थकबाकी चा डोंगर झाला.सदरची थकबाकी आपणास देखील एकाच वेळी भरणे शक्य नसेल तर हफ्त्याने भरण्याची सोय् महावितरण ने आपणा साठी केलेली आहे.या साठी आपण आपल्या नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया हफत्यांने का होईना आपण आपल विज बिल भरुन महावितरण ला सहकार्य कराव ही विनंती महावितरण चे अधिकारी यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून स्थानीय लोकांना केले . या वेळी
नगरसेविका सौ.विजयाताई भीकन पवार,
नगरसेवक चिरागोदीन शेख,नगरसेवक चंदू तायडे,नगरसेवक सदाशिव आप्पा गवळी
सामजीक कार्यकर्ते बबन भाऊ पवार
व स्थानीय नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक चिरागोदीन शेख व सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी आपल्या वार्ड च्या नागरिकांच्या समस्या महावितरण अधिकारी समक्ष मांडल्या व लवकरात लवकर नागरिक वीज बिल भरतील तसेच कोणाचा वीज पुरवठा खंडित करु नये अशी विनंती केली .