सुरवातीच्या २ महिन्यात जर फुटतील भुयारी गटारींचे चेंबर,तर कसे होणार शहरात काम एक नंबर….

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारींची सुरुवातच जर कमकुवत असेल शेवट मजबूत कसा होणार अशी चर्चा शहरात प्रभाग क्रमांक एकच्या भुयारी गटारी वरील फुटलेले चेंबर पाहिल्यावर सुरू आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील यश नगरी जवळील भुयारी गटार वरील चेंबर दहा पंधरा दिवसापासून फुटलेले असून लक्ष द्यायला कोणी तयार नाही,भुयारी गटारीचे चेंबर फुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या प्राभागात भुयारी गटारीचे काम होऊन फक्त दोन महिने झाले तेवढ्यात दुसऱ्यांदा याचा प्रभागातील चेंबर फुटले आहे.या पूर्वी देखील चेंबर फुटले होते ते १५ दिवसांपूर्वी दुरुस्त केले आता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी चेंबर फुटल्यामुळे या ठिकाणी रात्री अंधार असल्याने छोटे मोठे अपघात होण्याचे प्रकार सुरू झाले आहे.या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी रात्री क्लास वरून ये जा करतात एखादी चेंबर मध्ये पडल्यास काही दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण राहणार? तुटलेल्या चेंबर मुळे अपघाताचा धोका माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून नगरपालिका प्रशासन काय भूमिका बजावताय असा प्रश्न आहे. आजून भुयारी गटारी पूर्ण झाल्या नाहीत सुरवात आहे.कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू असलेले भुयारी गटार वरील चेंबर जर २ महिन्यात दुरुस्त करावे लागत असेल तर नागरपलीका प्रशासन कामाच्या दर्जाकडे लक्ष देत आहे की नाही नेमकं चाललंय काय सुरवातीलाच जर कामाचा दर्जा असा असेल तर शेवटी नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू असलेले काम असुविधा निर्माण करणार यात शंका नाही.