संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक 2024 ही जळगांव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असणारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली,दिवस रात्र समर्थकांची सुरू असलेली धावपळ आज थांबली पण प्रामाणिक समर्थकांचे असलेले योगदान आठवण ठेवत त्यांच्या जीवनात सुरू असलेली धावपळ नेत्यांनी थांबवली पाहिजे म्हणजे झालं.
निवडणूक म्हटली की भाऊ,मित्र,नाते,संबंध या पलीकडे आपला नेता समर्थकाला प्रामाणिक असतो निवडणूक प्रचार पासून ते पक्षाचा प्रसार करण्यासाठी धावपळ करतो तो प्रामाणिक कार्यकर्ता परिवाराला वेळ न देता वेळ देतो प्रचाराला जेवणाचा वेळ नाही दमून घरी रात्री बेरात्री यायचे सकाळी नेत्या आगोदर कार्यालयात तयार असणारा कार्यकर्ता आपल्या आयुष्याची धावपळ बाजूला ठेवून आपल्या नेत्यांसाठी धावपळ करत असतो मात्र नेता निवडून आला की जवळ येतात ते संधीसाधू आणि प्रामाणिक समर्थकाकडे होते दुर्लक्ष आणि त्याच्या जीवनात प्रचाराची धावपळ संपली की आयुष्याची धावपळ होते पुन्हा सुरू पण नेत्यांची एवढी जबाबदारी नक्की आहे,की आपल्या साठी धावपळ करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील धावपळ थांबवत रोजगार मिळवून देत छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी मागे समर्थपणे उभे राहत सहकार्य केले पाहिजे पण पोटाचा प्रश्न सुटला तर प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या पासून तूटेल की काय या भीतीने असो की स्वतच्या स्वार्थासाठी त्याचा हा प्रश्न प्रलंबित ठेवायचा आणि वेळ आली की आठवण करायची आणि पोसायचे ते गोड बोलणाऱ्या,लबाड,स्वार्थी लोकांना जे जिकडे वार असते तिकडे निघतात पण खऱ्या कार्यकर्त्यांना मिळते ती फरफट आणि आयुष्यभर धावपळ तरी आता प्रामाणिक कार्य करणाऱ्या समर्थकांना त्यांच्या नेत्याचे आयुष्यात किती समर्थन मिळते हे कळेल पण समर्थकांची वेळ गेलेली असेल आणि नेत्यांची आलेली असेल म्हणून आयुष्याच्या धावपळीत नेत्यांसाठी केलेली धावपळ ही फक्त आठवण नको तर सन्मान म्हणून आठवण राहिले पाहिजे एवढे नक्की आणि समर्थकांनी प्रामाणिक राहावे पण कोणाबरोबर हा विचार नेत्यांची वागणूक पाहून नक्की करावा म्हणजे झाले….
