संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) : जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघातील मतदान सोमवारी होणार आहे. त्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यात मतदान शांततेत पार पाडणे, तसेच कायदा आणि सु्ुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्ह्यात बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी शहर, तसेच उपनगरातील मतदान केंद्रांच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक,9 अप्पर पोलीस अधीक्षक,31 पोलीस निरीक्षक,119 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक,जिल्ह्यातील 2550 अंमलदार,बाहेरील पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक 70,बाहेरील अंमलदार 2360,होमगार्ड 3085,बाहेर राज्यातील 3 कंपनी(केरला-2 कर्नाटक 1)
बी एस एफ– 1 कंपनी,सी आय एस एफ 1 कंपनी,स्ट्रॉंग रूमसाठी 2 राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ),2 केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
चाळीसगाव तालुक्यात देखील कडक बंदोबस्त
चाळीसगाव तालुका परिसरात 15 पोलीस अधिकारी 450 पोलीस कर्मचारी व 250 होमगार्ड बंदोबस्तास तैनात राहणार असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचारी अलर्ट असून वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत कडक बंदोबस्त राहणार असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले आहे.
