अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दि.१७ सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी रात्री १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मौजे सोनवडी ता.दौंड गावाच्या हददीतून सुरज संभाजी पवार यांच्या राहते घरासमोर लावलेला ट्रक क्रमांक एम एच १२ इ एफ ९६४८ हा अज्ञात चोरटयांनी चोरण्याचा प्रयत्न केल्याने सुरज पवार यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमांविरोधात भा.द.वी कलम ३७९,५११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे सो यांनी डी.बी. पथकास बोलावून सदर अज्ञात आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या, त्या अनुशंगाने तात्काळ डी.बी पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढून दोन संशयीत इसम नामे १)राहूल अर्जुन राठोड २) सुशांत
अनिल पवार दोन्ही रा.सोनवडी ता.दौंड जि.पुणे यांना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधीशांनी पुढील तपास कमी सदर आरोपींना ३ दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी,स.फौ महेंद्र गायकवाड,पो.हवा सुभाष राउत,पो.ना किरण राउत,पो.ना अमोल गवळी,पो.ना आदेश राउत पो.कॉ.अमोल देवकाते
यांनी केली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास मा.पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ महेंद्र गायकवाड करीत आहेत