अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी(दि 2):-पिंपरी चिंचवड शहर मध्ये ऑल इंडिया पँथर सेने तर्फे कँडल मार्च उत्तर प्रदेश मध्ये घडत असलेल्या सतत बलात्कार प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेना तर्फे पिंपरी चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालय येथे मार्च कँडल करण्यात आले यावेळी
उत्तर प्रदेश येथील हाथरस मध्ये दलित तरुणी मनीषा वाल्मिकी हिच्यावर काही समाजकंटक/नराधमांनी अमानुष पणे अत्याचार करीत तिची जीभ कापली तसेच पाठीचा कणा मोडला अश्या परिस्थिती मध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता तिचा दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी दुर्देवी अंत झाला तरी सदरप्रकरणातील आरोपींवर अट्रोसिटी अंतर्गत,बलात्कार प्रकरणी,तसेच खुनाचा गुन्हा दाखल करीत जलद गती न्यायालय मध्ये हा खटला चालवण्यात यावा यासाठी ऑल इंडिया पँथर सेने च्या वतीने पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजय गायकवाड म्हणाले की नराधमांना फास्ट्रेक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हाची व यूपी सरकारचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे पुणे जिल्हा महासचिव धीरज धुळे ही म्हणाले की देशात कोणता ही राज्य असो दलितांवरील अत्याचार हे प्रत्येक राज्यात घडत असते खैरलांजी हत्याकांड बद्दल देखील ते हणाले की 29 सप्टेंबर 14 वर्षांपूर्वी जे घडले ते दलित समाज अजून विसरले नाही भोतमांगे कुटुंबाला जसे समाज कंठकाने संपवले तसे त्यांना सरकार व न्यायालय देखील न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरली आहे सरकार कोणाचे ही असो दलितांवरील अत्याचार थांबवण्यात अपयशी का ठरते असा प्रश्न त्यानी या वेळेस उपस्थित केला आहे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्याऐवजी विडिओ द्वारे संपर्क केला आहे याचा देखील त्यांनी निषेध नोंदवला आहे यावेळी
ऑल इंडिया पँथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजय गायकवाड तसेच , पुणे जिल्हा अध्यक्ष आयु . शरद गायकवाड , पुणे जिल्हा महासचिव . धिरज धुळे , पुणे जिल्हा कार्यध्यक्ष . बाळासाहेब शेंडगे , पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष . किशोर अप्पा काशीकर , वाल्हेकरवाडी शाखाध्यक्ष. करण अर्जुन इंगळे, हे उपस्थित होते