अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले. दौंड मध्ये संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गट ,न्यू दलित पँथर ऑफ इंडिया ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विविध संघटना पक्षांनी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला
दौंड मध्ये संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गट ,न्यू दलित पँथर ऑफ इंडिया ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विविध संघटना पक्षांनी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला
यावेळी .RPI(आंबेडकर)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी दौंड येथे पत्रकार परिषद घेत,RPI(आंबेडकर) हा पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असून R P I (आंबेडकर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालणारा पक्ष आहे, कार्यकर्ते , पक्ष व संघटना यांना घेऊन नेहमी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न केला असून आता कार्यकर्ते व आंबेडकरी विचारधारेला अनुसरून काम करणाऱ्या सर्वांना सोबत घेत काम करू व निवडणूक स्वबळावर लढू असे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रा.दिनेश पवार सर व रवी पवार यांनी केले.