Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चाळीसगांव तालुक्यात विकासकामांची एन्ट्री,९४ कोटींचा निधी मंजूर….

0
0 0
Read Time7 Minute, 12 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)– भाजपा महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आज दि.७ पासून नागपूर येथे सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ९४ कोटींचा भरघोस निधी मंजूर करण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले आहे. त्यात वलठान येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा जीर्ण इमारतीजवळ नवीन G+2 भव्य इमारत (१३ कोटी २६ लक्ष) व आदिवासी मुलींचे वस्तीगृह (१४ कोटी ५० लक्ष), तालुक्यातील विविध महत्वाचे रस्ते व पूल (५६ कोटी), २६ नवीन तलाठी कार्यालये (३ कोटी ९० लक्ष), ट्रामा केअर सेंटर येथे शस्त्रक्रिया गृह (OT) व मोड्युलर अतिदक्षता विभाग (ICU) बांधकाम करणे (३ कोटी ३६ लक्ष), कॉमन पूल टाईप ची २ शासकीय निवासस्थाने बांधकाम करणे (३ कोटी ६३ लक्ष) अश्या कामांचा समावेश आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव मतदारसंघात भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यांनतर दीडच वर्षात शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यात या निधीची भर पडल्याने विकासकामांना अधिक गती मिळणार आहे. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

चाळीसगाव मतदारसंघातील विविध विकासकामे, मंजूर रस्ते आणि पुलांची कामे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे –

1 – शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण येथे मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम करणे – 14 कोटी 51 लक्ष

2 – शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण येथे शालेय इमारत (G+2) चे बांधकाम करणे – 13 कोटी 27 लक्ष

3 – वाघळी ते चांभार्डी रस्ता येथे पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 5 कोटी 21.97

4 – चाळीसगांव येथे 26 तलाठी कार्यालय बांधकाम करणे. – 3 कोटी 90 लक्ष

5 – चाळीसगाव, जि जळगाव येथे कॉमन पूल टाईप 2 ची निवासस्थाने बांधकाम करणे. – 3 कोटी 63 लक्ष

6 – ट्राँमा केअर चाळीसगाव येथे मॉडयुलर शस्त्रक्रिया गृह (OT) व मॉडयुलर अतिदक्षता विभाग (ICU) चे काम करणे – 3 कोटी 37 लक्ष

7 – रा.म.211 घाट रोड बायपास ते नगरपालिका हद्दीत बाजार समितीपर्यंत रस्त्याची सुशोभिकरणासह रुंदीकरण व सुधारणा करणे. – 3 कोटी

8 – गणेशपूर ते पिंप्री बु प्र चा पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 3 कोटी

9 – शेवरी ते ब्राम्हणशेवगे रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी 90 लक्ष

10 – खराडी ते ओढरे रस्त्याच्या लांबीमध्ये जलनिस्सारणासह सुधारणा करणे. – 2 कोटी 50 लक्ष

11 – मजरे ते मुंदखेडा रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी 40 लक्ष

12 – टाकळी ते शिरसगाव रस्ता सुधारणा करणेसह माळशेवगे गावात आर.सी.सी. गटारीचे बांधकाम करणे. – 2 कोटी 30 लक्ष

13 – गणेशपूर ते शिंदी पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 2 कोटी 19 लक्ष

14 – लोंजे ते रा.मा.24 नागद रोड पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

15 – रहीपुरी ते वडगांव लांबे रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

16 – वडगांव लांबे ते भोरस रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

17 – करगाव ते तरवाडे रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

18 – तरवाडे ते रहिपुरी रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

19 – नगरदेवळा नेरी भामरे रस्ता प्रजिमा-56 किमी 0/00 ते 2/500 ची सुधारणा करणे, ता- चाळीसगाव – 2 कोटी

20 – पिंपळवाड म्हाळसा ते आडगाव धामणी नदीवर पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 2 कोटी

21 – शामवाडी गावालागत रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 80 लक्ष

22 – गणेशपूर ते ओढरे रस्ता पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 1 कोटी 79 लक्ष

23 – उंबरखेड ते पिंप्री खु रस्ता उंबरखेड गावातील लांबीत सुधारणा व गटार बांधकाम करणे – 1 कोटी 75 लक्ष

24 – कळमडू ते शिदवाडी सुटलेल्या रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 60 लक्ष

25 – करगाव ते खरजई रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 50 लक्ष

26 – पिंपरखेड गावाजवळ पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 1 कोटी 48 लक्ष

27 – देवळी गावाजवळ जुन्या मालेगाव रोडवर मोरीसह रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी 30 लक्ष

28 – पिंपरखेड गावालगत रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 20 लक्ष

29 – शिदवाडी ते जामदा रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 20 लक्ष

30 – खेडगांव ते ऋषिपांथा रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी

31 – गुजरदरी ते जिल्हा हद्द जलनिस्सारनाच्या कामासह डांबरीकरण करणे. – 1 कोटी

32 – ओझर ते वाघडू रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी

33 – देशमुखवाडी ते सायगाव रस्त्याची सुधारणा करणे. – 80 लक्ष

34 – वडाळा ते बांबरूड (तालुका हद्द) रस्त्याची सुधारणा करणे. 30 लक्ष

35 – करजगाव ते शिंदी रस्त्याची सुधारणा करणे. 25 लक्ष

36 – शिंदी ते ओढरे रस्त्याची सुधारणा करणे. 20 लक्ष

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: