खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणी साठी लेखापरीक्षक नियुक्त
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगांव(प्रतिनिधी)-कोविड खाजगी रुग्णालयाच्या बिला संबंधित संपूर्ण महाराष्ट्रातुन येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आता संपूर्ण राज्यात कोविड रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणी साठी लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले असून आता रुग्णांना आता या अव्वा च्या सव्वा बिलापासून सुटका मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
चाळीसगाव शहरातील कृष्णा क्रिटिकल केअर सेंटर,समर्थ हॉस्पिटल,बालाजी हॉस्पिटल,कल्पतरु हॉस्पिटल,शिवशक्ती हॉस्पिटल,बापजी हॉस्पिटल,गजानन हॉस्पिटल,सरस्वती हिस्पिटल व सी टी केअर हॉस्पिटल या खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये श्री मनोज पाटील उपकोषागार अधिकारी चाळीसगाव(9422792354) व श्री कुणाल कोष्टी लेखापाल नगर पालिका चाळीसगाव यांची कोविड रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणी साठी लेखापरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली असून कोविड रुग्णांच्या बिल संबंधित काही तक्रार असल्यास संपर्क साधण्याचा आव्हान जळगाव जिल्हा प्रशासनाने केले आहे.