दौंड येथे 6 रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित दौंड तहसीलदारांची मोठी कारवाई
Read Time1 Minute, 5 Second
दौंड(प्रतिनिधी दि 23):- आज संपूर्ण देशासमोर कोरोनाचे मोठे आव्हान उभे आहे या परिस्थितीत शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे जेणे करून या संकटाशी सामना करता यावा अश्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होऊ नये म्हणून शासनाने गोर गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळण्याची व्यवस्था केली असतांना काही रेशन दुकानदार शिधाधारकांची अडवणूक करत असल्याचे लक्षात येताच कर्तव्यदक्ष अधिकारी मा तहसीलदार दौंड संजय पाटील यांनी 6 दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहे या कारवाई मुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे व काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांना नक्की धडकी भरली असेल.