मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती,मुख्यमंत्र्यांची बैठक गांभीर्याने चर्चा..

Read Time2 Minute, 12 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

मुंबई(वृत्तसंस्था)दि. १०:– मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली.मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकास मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, तसेच परिवहन मंत्री ऍड अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली. त्यावर बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री. चव्हाण आणि उपस्थितांनी मराठा आरक्षण लागू होण्यासाठी ठामपणे बाजू मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महसूल व वन विभागाचे सचिव किशोर राजे- निंबाळकर उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

रुग्ण हक्क परिषदेच्या विधिमंडळ कामकाज सचिवपदी मधुकर पारसे तर मंत्रालयीन सचिवपदी शाहरूख मुलाणी यांची नियुक्ती

Read Time1 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

मुंबई – रुग्णांच्या हक्कांची चळवळ उभी करणारी आंदोलक संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद अल्पावधीतच नावारूपाला आली आहे, सामाजिक विषयांवरील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद सातत्याने कार्यरत आहे. शासनदरबारी अनेक प्रलंबित असलेले विषय, विधिमंडळ आणि मंत्रालयीन कामकाजात पाठपुरावा करण्याचे काम अनेक दिवसांपासून करत असणारे रुग्ण हक्क परिषदेचे मुंबईस्थित पदाधिकारी मधुकरराव पारसे यांची विधिमंडळ कामकाज सचिवपदी तर मंत्रालयीन सचिव पदी मुंबईतीलच शाहरुख मुलाणी यांची निवड रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
मूळचे माळशिरस, जि. सोलापूर येथील मधुकर पारसे यांना मंत्रालय – विधिमंडळ कामकाजाचा गेली १८ वर्षे प्रदीर्घ अनुभव आहे. गेली वर्षभर रुग्ण हक्क परिषदेत ते कार्यरत आहेत. आज त्यांची विधिमंडळ कामकाज महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तर मंत्रालयातील पत्रकारितातेत अभ्यासू मांडणी करणारे शाहरुख मुलाणी यांची मंत्रालयीन सचिव पदी महाराष्ट्र प्रदेश कमिटीत नियुक्ती केली आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दिपेश नारायण सेवेकर यांची ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड…!

Read Time1 Minute, 46 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांच्या आदेशाने संदेश वाघचौरे मुंबई प्रदेश अध्यक्ष यांनी नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.
यासाठी लढाऊ पँथर्सचं संघटन वाढवत आहे.
महाराष्ट्रातल्या पदाधिकार्यांनी या नियुक्तीच स्वागत केले
ऑल इंडिया पँथर सेना
महाराष्ट्र भर होणाऱ्या दलीत आत्याचारवर मात म्हणून ऑल
दलीत पँथर सेने मध्ये ठाणे , कळवा , मुंब्रा , दिवा , डोंबिवली कल्याण यातून मोठ्या प्रमाणात तरुणांनी ऑल इंडिया पँथर सेने मध्ये प्रवेश केला
त्यांचे सर्वांचे ऑल इंडिया पँथर सेना स्वागत करते

 • विनोद भोळे
  महाराष्ट्र महासचिव
 • हर्ष ताकसांडे
  महाराष्ट्र प्रसिद्धिप्रमुख तथा प्रवक्ता
 • कैलास काळे
  महाराष्ट्र आयटी प्रमुख
 • संदेश वाघचौरे
  मुंबई प्रदेश अध्यक्ष
  सचिन जाधव
 • ठाणे जिल्हा संघटक
8 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले.

Read Time5 Minute, 2 Second

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:आपले सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, महसूल खात्याचे कर्मचारी आहेत जे जे कोणी या युद्धात आपल्यासोबत अहोरात्र मेहनत करत आहे त्यांना मी धन्यवाद देतोय.काल आपल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. सगळे जण मास्क लाऊन बसले होते, अंतर ठेऊन बसले होते. कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सने घेतलेली पहिली मंत्रिमंडळाची बैठक असेल.४ आठवड्यांमध्ये ग्राफ पाहिला तर तो वाढलेला आहे. वाढ नक्की होत आहे पण ही वाढ मला जरा सुद्धा नको. मला वाढ नको, मला तो ग्राफ खाली आणायचा आहे.हे युद्ध जिंकल्यानंतर मोठं युद्ध जे होऊ शकेल ते म्हणजे अर्थव्यवस्थेचं, त्या युद्धाला आपली तयारी पाहिजे. ताकद, हिंमत, जिद्द केवळ याच युध्दात नाही तर पुढच्याही युद्धात आपल्याला वापरायची आहे.ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांच्यासाठी आपण शिवभोजन योजना लागू केली आहे. ती १ लाखापर्यंत जेवणाची सोय करण्याची परवानगी मी दिलेली आहे. पण त्याही पलीकडे जायचं असेल तर तेही करण्याची परवानगी आपण देऊन ठेवलेली आहे.मदत केंद्रांमध्ये जवळपास ५.५-६ लाख लोकांना दिवसाला ३ वेळा, सकाळची एक न्याहारी आणि दिवसाचं २ वेळेचं भोजन आपण त्यांना देतोय. सोबत डॉक्टर्स आहेत. माता-भगिनी, बालकांची वेगळी सोय केली आहे.केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे पण केंद्राने जी योजना दिली आहे त्यात फक्त तांदूळ आहे ज्याच वाटप सुरू झालेलं आहे. आणि ही योजना अन्न व्यवस्थेतील लाभार्थ्यांसाठी आहे म्हणजे केशरी कार्ड वाल्यांसाठी नाही आहे.मदत केंद्रांमध्ये जवळपास ५.५-६ लाख लोकांना दिवसाला ३ वेळा, सकाळची एक न्याहारी आणि दिवसाचं २ वेळेचं भोजन आपण त्यांना देतोय. सोबत डॉक्टर्स आहेत. माता-भगिनी, बालकांची वेगळी सोय केली आहे.केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे पण केंद्राने जी योजना दिली आहे त्यात फक्त तांदूळ आहे ज्याच वाटप सुरू झालेलं आहे. आणि ही योजना अन्न व्यवस्थेतील लाभार्थ्यांसाठी आहे म्हणजे केशरी कार्ड वाल्यांसाठी नाही आहे.मी माननीय पंतप्रधानांना काल एक प्रत्र दिलं आहे की आपण सगळ करत असताना ज्यांच उत्पन्न मासिक शहरामध्ये ५० हजार ते १ लाख आणि ग्रामीण भागामध्ये ४० हजार ते १ लाख आहे त्यांनासुद्धा आपण काहीतरी योजना केली पाहिजे.जे केशरी रेशन कार्ड वाले आहेत, त्यांना आपण ३ किलो गहू ₹८ प्रतिकीलो दराने आणि २ किलो तांदूळ ₹१२ प्रतिकिलो दराने आपण त्यांना उपलब्ध करून देत आहे.अनेकदा बातम्या येत आहेत की डॉक्टर्सना PPE किट्स, N95 मास्क नाही आहेत. पण त्याच वेळेला हे ही लक्षात घेतले पाहिजे की या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे.जर जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. मला तर असे वाटते की यातून बाहेर पडल्यानंतर पुढचे काही दिवस आपल्याला मास्क वापरला पाहिजे आपल्या सुरक्षेसाठी.आपण ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक खोलतोय. सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे ज्यांना असतील त्यांनी इतर हॉस्पिटल मध्ये जाऊ नका, आपण फिव्हर क्लिनिक मध्ये जा. तिथे गेल्यावर तपासले जाईल आणि त्यानंतर मार्गदर्शन केले जाईल की आपण कुठे जायला पाहिजे.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद.

Read Time3 Minute, 57 Second

मुंबई:-कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे परीक्षेबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षेचे नियोजन, नियंत्रणासाठी समिती या समितीत मुंबईचे डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणेचे डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटीच्या शशिकला वंजारी, शिवाजी कोल्हापूरचे देवानंद शिंदे या विद्यापीठांच्या कुलगुरूंसह तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षणचे संचालक धनराज माने यांचा समावेश- मंत्री उदय सामंत.कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालय, सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक ढकलले पुढे. मात्र, परीक्षा रद्द होणार नसून विद्यार्थी, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करणार.राज्यातील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव, स्थानिक परिस्थिती यांचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार होणार. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना अहवाल सादर झाल्यानंतर याबाबत निर्णय.कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध आजाराच्या चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब सुरू करण्याच्या यांच्या सूचना. त्यासाठी सर्व परवानग्या देणार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अशा प्रकारची लॅब सुरू.आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाकडून प्रयोग. आई-वडिलांची परवानगी घेऊन एनएसएसच्या २७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. आरोग्यसेवेसाठी विद्यार्थी झाले सज्ज. याच धर्तीवर इतर विद्यापीठांमधील विद्यार्थी आरोग्य सेवेसाठी घेण्याबाबत अहवाल द्यावा.COVID19 उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाकडून वेब-आधारित मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध. अशा प्रकारे इतर विद्यापीठांनीही सुविधा सुरू करावी- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश.कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून काटेकोर उपाययोजना. या संकटाच्या मुकाबल्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री-उदय सामंत यांचे आवाहन.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

जात,धर्म, भाषा,प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं-उपमुख्यमंत्री अजित पवार

Read Time3 Minute, 5 Second

मुंबई:-महावीर जयंती, हनुमान जयंती,‘शब्ब-ए-बारात’साठी
घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा-उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात,धर्म, भाषा,प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं.सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे.राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे.बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश,देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता, विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील.पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

3 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान-

Read Time2 Minute, 1 Second

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान-उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई-राज्यातील पोलिस दल ‘#कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ,आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ज जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित.

Read Time3 Minute, 2 Second

मुंबई:-कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित.अधिसूचना जारी केंद्रीय मंत्री मा:राजेश टोपे . या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर होणार उपचार. कोरोना बाधितांसाठी २३०५ खाटा उपलब्ध.केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांवर उपचार करणे या रुग्णालयांना बंधनकारक. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालयांत विलगीकरण कक्ष स्थापणार.

जिल्हा आणि त्यातील अधिसूचित रुग्णालयाचे नाव व खाटांची संख्या

ठाणे-
जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग- १००
मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय- १००
वाशी- सामान्य रुग्णालय-१२०
कल्याण डोबिवली मनपा– शास्त्री नगर दवाखाना-१००
रायगड– पनवेल उपजिल्हा रुग्णालय-१०० नाशिक– कुंभमेळा बिल्डिंग-१००,महानगरपालिका कठडा हॉस्पिटल- ७०
अहमदनगर– जिल्हा रुग्णालय-१००

नंदूरबार– डोळ्यांचा दवाखाना- ५०
धुळे– जिल्हा रुग्णालय शहारातील इमारत- ५०
पुणे– जिल्हा रुग्णालय, औंध- ५०
सातारा– सामान्य रुग्णालय- ६०. 🟩 सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड-७५
रत्नागिरी– सामान्य रुग्णालय- १००, कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय- ५०
औरंगाबाद– जिल्हा रुग्णालय- १००
हिंगोली– जिल्हा रुग्णालय- १००
हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय- ५०
लातूर– उदगीर उपजिल्हा रुग्णालय- ५०.

उस्मानाबाद– जिल्हा रुग्णालय, नविन इमारत-१००, उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डिंग- ५० आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत-५०
नांदेड– जिल्हा रुग्णालय जुने- ५०, मुखेड उपजिल्हा रुग्णालय- ५०
अमरावती– विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत-१००.🟩 वाशिम– जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत-५०
बुलडाणा-स्त्री रुग्णालय नवीन इमारत-१००
वर्धा– सामान्य रुग्णालय-५०
भंडारा– सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नवीन इमारत-८०
गडचिरोली– जिल्हा रुग्णालय-१००.

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान-मा:नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद.

Read Time5 Minute, 16 Second

मुंबई:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान-मा:नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद. दिल्लीतील मरकज मध्ये सहभागी राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचले, त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले. राज्यात लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येत असल्याची दिली माहिती.सर्वधर्माच्या प्रमुख गुरू, धार्मिक नेत्यांना विनंती करून गर्दी होणार नाही, सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे गरजेचे असल्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. त्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधण्याचे केले आवाहन.लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी नेमके कशा प्रकारे परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मागितले मार्गदर्शन. १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.लॉकडाऊन काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या मताला पंतप्रधानांनी केले अधोरेखित. लॉकडाऊननंतर एकदम लोंढे बाहेर दिसायला नकोत. सर्व काही व्यवस्थित सुरु झाल्याचे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना.परराज्यातील श्रमिक, कामगारांची पुरेपूर काळजी. ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनादेखील तिथेच राहण्याची विनंती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त कोरोना साठी सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय. येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था. पुणे येथेही कोविड रुग्णालयाची उभारणी होणार. मुंबई महापालिका रुग्णालयांत आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या, त्यामध्ये आता २१०० पर्यंत वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु. महापालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंगमधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती नव्या प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण. त्यासाठी पालिका अधिकारी-पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालयांचा ताबा. गरज पडल्यास एखादी मोठी जागा निश्चित करून आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्वी चाचण्या कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी. आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी. त्यांचे दोन-तीन दिवसांचे निदान एकत्रितरित्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचे चित्र. हे रुग्ण रुग्णालयांत दाखल, त्यांची प्रकृती स्थिर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची गरज. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना आवाहन

4 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं-उपमुख्यमंत्री अजित पवार

Read Time3 Minute, 2 Second

मुंबई:- स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हा, स्वत:ला, कुटंबाला वाचवा-उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई – ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्‌’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत.‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजीबाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.
राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे.या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही,आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं अजित पवार (उपमुख्यमंत्री) यांनी आवाहनही केलं आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %