आमदार चव्हाण यांनी पीर मुसा कादरी बाबा तलवार मिरवणुकीत सहभाग घेत घेतले दर्शन,उत्साहपूर्ण वातावरणात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणूक पार….

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरूस उत्सवानिमित्त पवित्र अश्या तलवार मातेची भव्य मिरवणूक चाळीसगाव शहरातून काढण्यात आली. कोरोना नंतर प्रथमच होत असलेल्या या उरूस उत्सवाला पूर्ण देशभरातील लाखो भाविकांनी भेट दिली व बामोशी बाबांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी मिरवणुकीत सहभागी होऊन सर्व भाविकांना उरूस उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या-आमदार मंगेश रमेश चव्हाण
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले पीर मुसा कादरी बाबा तलवार मिरवणूक निमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील लाखो भाविकांनी दर्शन घेतले यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आपला सहभाग नोंदविला व दर्शन घेतले.
अनेक वर्षांपासून अखंडित चालत येणारी परंपरा यावर्षी देखील उत्साहात पार पाडण्यात आली,दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पीर मुसा कादरी बाबा तलवार मिरवणूक अति उत्साहात काढण्यात आली.यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती या गर्दीत आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आपली हजेरी लावत दर्शन घेतले.भाविकांना कोणत्याही प्रकारची दर्शनासाठी गैरसोय होणार नाही याची काळजी घेत भाविकांसाठी तलवारीचे दर्शन घेण्यासाठी योग्य असे नियोजन करण्यात आले होते.याच बरोबर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी पोलीस निरीक्षक के के पाटील व सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत उत्साह पूर्ण वातावरणात तलवार मिरवणूक दर्गा पर्यंत नेत मिरवणूक शांततेत पार पाडली.