आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पुन्हा सुरू करावा डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा विशेष
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील कित्येक दिवसांपासून बंद असलेला हनुमान वाडी येथील डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना पुन्हा सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कबीर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार,आमदार व माजी आमदार यांना केली आहे.
शहरात विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत वेळोवेळी डोळ्यांच्या तपासणीचे आरोग्य शिबिर घेण्यात आले आहेत. चष्मे वाटप पासून ते शस्त्रक्रिया पर्यंत विविध उपचार रुग्णांवर करण्यात आले. यामुळे शहरातील गोरगरीब रुग्णांना याचा फायदा नक्कीच झाला.मात्र मोफत शस्त्रक्रियांसाठी शहराच्या बाहेरील सामाजिक संस्था संचालित रुग्णालयात जावे लागले. जर धर्मार्थ डोळ्यांचा दवाखाना सुरू असता तर रुग्णांना ही सेवा शहरातच मिळाली असती यामुळे पुन्हा जर हा डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना सुरू झाला तर कदाचित रुग्णांना याचा जास्त फायदा मिळेल तसेच गरजू रुग्णांना नेहमीसाठी सेवा उपलब्ध होईल.यासाठी खासदार उन्मेष पाटील,आमदार मंगेश चव्हाण तसेच माजी आमदार राजीव देशमुख यांनी एक मत करत हा डोळ्यांचा धर्मार्थ दवाखाना लवकरात लवकर सुरू करावा व गोरगरिबांना याचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कबीर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.सोशल मीडिया वर त्यांच्या या मागणीला चांगला प्रतिसाद मिळत असून या उपक्रमासाठी एक सुज्ञ नागरिक म्हणून तालुक्यातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व बंधूंनी काही ना काही देणगी द्यावी जेणेकरून चांगला पैसा जमा होईल व गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळेल असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक गोरख साळुंखे यांनी व्यक्त केले असून या कार्याची सुरुवात स्वतःपासून करत जेव्हा उपक्रम सुरू कराल तेव्हा प्रथम स्वतः ११ हजार रुपयाची देणगी देणार असल्याचे त्यांनी कबूल केले.गोरगरीब जनतेसाठी आजी माजी लोकप्रतिधींनी एकत्र येत ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करून दवाखाना पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी पाऊल उचलावे व तुमच्या पुढाकाराच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासीयांना होकार द्यावा…..