अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी दानिश मणियार
बहाळ(चाळीसगाव)- बहाळ गावात सांडपाण्याच्या किरकोळ वादातून एकाला लठ्या काठ्यांनी मारहाण करत डोक्यात कोयता टाकल्याने गंभीर दुखापत ९ लोकांवर पुतण्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल पुढील तपास सुरू.
दि १३ मे २०२४ रोजी सध्यकाली ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास भावाचा घरी कानबाईचा कार्यक्रम सुरू असताना दशरथ विठ्ठल शेवरे यांना काकूंनी घरी सोडण्यास सांगितले असता घरी सोडण्यासाठी गेलो तेव्हा काका अभिमान सुकलाल शेवरे यांच्याशी समोर राहणारे सुरेश मंगा भोई,दिपक सुरेश भोई,कैलास भिकन भोई,रमेश मंगा भोई,गिरीष रमेश भोई,अक्षय रमेश भोई,उषाबाई रमेश भोई,मायाबाई सुरेश भोई,संगिताबाई बाबुलाल भोई हे मोठ मोठ्याने वाद घालत होते तेव्हा त्यांना अभिमान शेवरे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्होते व त्यांनी काका अभिमान शेवरे यांना जमिनीवर पाडून लाता,बुक्के व लाठ्या-काठ्यांनी मारण्यास सुरवात केली यावेळी सुरेश भोई यांनी मच्छी कापण्याच्या कोयत्याने आज याला जिवंत ठेवत नाही म्हणत डोक्यावर व डाव्या कपाळावर मारल्याने गंभीर जखम झाली रक्तस्त्राव सुरु झाल्याने वरील सर्व आरोपी तेथून पसार झाले,यावेळी तात्काळ त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने ओमनी गाडीत टाकून रुग्णालयात दाखल केले.
दशरथ शेवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३०७,३२५,१४१,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१),३७(३) नुसार मेहूनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
