उपजिल्हा रुग्णालयातुन हितसंबंध असणार्यांना लस?, ज्येष्ठ नागरिकांचे हाल?,नायब तहसीलदारांना चौकशी करत कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

1 0
Read Time3 Minute, 1 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-शहरात असलेल्या जिल्हा उपरुग्णालयात कोविड ची लस घेण्याकरता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न देता तिथून घरी पाठवण्यात आले, वय वर्षे 18 ते 44 वयातील नागरिकांनाच लस देण्यात यावी अशी कुठली ही लेखी सूचना नसताना डॉक्टर संग्राम डांगे यांनी 44 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना दोन तास रांगेत थांबून त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्या नंतर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही 44 वर्षे च्या पुढे आहात तुम्हाला लस देता येणार नाही तुम्ही घरी जावा. वय वर्ष 50, 60,70 अशा वयातील नागरिकांना लसीची जास्त आवश्यकता असताना त्यांची अशी हेळसांड या रुग्णालयांमध्ये केली गेलेली आहे.
तसेच रॅमसीडीवीर इंजेक्शन यादेखील बाहेर व्यक्तिगत हितसंबंध असणाऱ्या नागरिकांना वाटण्यात आलेले आहेत, (फॅबीकवीर) ज्या गोळ्या कोविड वरती खूप गुणकारक आहेत त्याची किंमत बाजारामध्ये दीड हजार ते दोन हजाराच्या पुढे पर्यंत आहे, अशा महागड्या गोळ्या गोरगरीब रुग्णांना न देता त्यांना बाहेरचे मेडिकल दाखवन्यात येते आणि आपले हितसंबंध असणाऱ्यांना मात्र या गोळ्या तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातात.
मध्यंतरी जो कोविडच्या लसींचा स्टॉक होता, तो फक्त आणि फक्त अपंग नागरिकांसाठी आहे आणि त्यांचीच लसीकरण चाललेले आहे असे सांगण्यात येत होते मात्र या काळात देखील राजकीय पक्षाच्या लोकांनाच लसी पुरवल्या जात होत्या.
वरील सर्व गोष्टींची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरून व्हावी असे पत्र नायब तहसीलदार मा. आखाडे साहेब यांना आज दि 24 जून 2021गुरुवार रोजी देण्यात आले.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुका सचिव अजिंक्य गायकवाड,दौंड शहर संघटक,राहुल नायडू,दौंड शहर मुख्य सचिव अक्षय शिखरे,दौंड,कार्याध्यक्ष शिवा खारारे,अक्षय हाडमोडे,उमेश नडगमकर सर,अक्षय जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.