वैभव संगोपन योजनेतून पांडववाड्याचे रूप पालटणार
एरंडोल(प्रतिनिधी): आज दि १२ जानेवारी २००२० रोजी एरंडोल येथील ऐतिहासिक पांडव वाडाची दुरावस्था प्रत्यक्ष भेट देऊन बघितली असून येत्या काळात या वाड्याचे पुनरवैभव प्राप्त करून देण्यासाठी ऐतिहासिक वास्तू संगोपन योजनेत समावेश करून एरंडोल शहराचा वैभवात भर घालणाऱ्या पांडव वाड्याचे गतवैभव प्राप्त करू देऊ अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे . आज या ऐतिहासिक वाड्यास केंद्राच्या पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी नगराध्यक्ष रमेश काका परदेशी , राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक एरंडोल तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किशोर पाटील कुँझरकर, नगरसेवक जगदीश ठाकूर ,भाजप शहराध्यक्ष निलेश परदेशी ,भरत महाजन, सामाजिक कार्यकर्ते सचिन विसपुते,रवींद्र पाटील, शंतनू भेळसेकर, मयूर ठाकूर, अमोल भावसार, भोला महाजन, पिंटू सोनार, रवींद्र पाटील, शुभम मोराणकर,मयूर बिर्ला, राजेश शिंपी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान त्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं धारणगाव चौफुली येथे आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ला खासदार पाटील यांनी भेट देऊन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चे दर्शन घेतले व त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असून सर्वांनी त्यांचे संस्कार पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी एरंडोल नगरपालिकेचे सभापती नगरसेवक डॉक्टर सुरेश पाटील, मराठा सेवा संघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर , संभाजी ब्रिगेडचे रवींद्र पाटील, राकेश पाटील, जगदीश ठाकुर, निलेश परदेशी आदींसह शहरातील सर्वपक्षीय सर्व समाजघटक उपस्थित होते.