
करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो-पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हे निर्णय घ्यावे लागले आहेत. ही व्हायरसविरोधातली लढाई आहे. त्यामुळे लॉकडाउन पुकारावा लागला असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाची माफी मागितली.
लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
करोनाशी लढाई करायची असेल तर लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. करोना व्हायरससोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. जगभरात करोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. भारतात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगितले. अनेक लोक माझ्यावर नाराज असतील, मी असा कसा निर्णय घेतला? हे असे कसे पंतप्रधान आहेत? असेही अनेकांना वाटले असेल. मात्र कठोर निर्णयांशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असेही मोदींनी स्पष्ट केले. तसेच करोनासोबतची लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला.

Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating