कोरोना विषाणूबाबत पुणे विभाग माहिती पत्र

Read Time3 Minute, 16 Second

पुणे(प्रतिनिधी):- दि. 30/03/2020 पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)च्या दि.२९/०३/२०२० रोजी एकूण २१६०३ फे-यांपैकी १९९९३ फे-या रद्द केल्या. १६१० फे-यांमध्ये एकूण ५१६१ प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. सद्या फक्त अत्यावश्यक बाबींसाठी फे-या सुरु ठेवलेल्या आहेत.

1)पुणे विभागामध्ये कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्येमध्ये 8ने वाढ झाली असून आज दि.30/03/2020 अखेर एकूण रुग्णसंख्या 72 आहे (पुणे 43, सातारा २, सांगली २५ आणि कोल्हापूर

2). आज पुण्यामधील कोरोना विषाणूबाधीत 52 वर्षाच्या एका पुरुष रुग्णाचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे.सदर रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तथापि कोणापासून संसर्ग झालेला आहे याची अदयाप निश्चीत माहीती मिळालेली नाही.

3)तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1365 होते. त्यापैकी 1282 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 83चे अहवाल प्रतीक्षेत आहे.प्राप्त अहवालापैकी 1193 नमुने निगेटीव्ह आहेत व 67 नमुने पॉझिटीव्ह आहेत. तसेच 22नमुने निष्कर्ष न काढण्यायोग्य आहेत. आतापर्यंत15 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7397 प्रवाशापैकी 4381 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून ३०१६ प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, म्हणजेच ३०१६ व्यक्तींचा होम क्‍वारंटाइन कालावधी पूर्ण झालेला असून ४३८१ व्यक्ती अजूनही क्‍वारंटाइन आहेत.

4) सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन, पुणे यांच्‍याकडून प्राप्त माहितीनुसार विभागामध्ये एन ९५ मास्‍क २८५८९ व २ प्‍लाय आणि 3 प्‍लायचे 209024 इतके मास्‍क उपलब्धआहेत.

5) विभागातील बाजार समित्यामध्ये दि.29.3.2020 रोजी 12984 क्विंटल भाजीपाला,10956 क्विंटल फळे 45839 क्विंटल कांदा/बटाटा इतकी अंदाजे आवक झालेली आहे. तसेच 11,82,717 क्विंटल अन्न-धान्याची आवक झालेली आहे.पुणे शहरामध्ये 13516 भाजीपाल्याच्या दुकानांमधून व 64 शेतकरीबाजार संयोजकांकडून भाजीपाल्याचे वितरण होत आहे.

6)दुध संकलन व वितरण- पुणे विभागामध्ये दि.29मार्च 2020चे एकुण संकलन 89.88 लक्ष लिटर असून 24.40 लक्ष लिटरचे पॅकेजिंग झालेले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम किशोर नवल यांच्‍याकडून पहाणी
Next post पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिक चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 50 कुटूंबाना भाजीपाला वाटप
error: Content is protected !!
%d bloggers like this: