चाळीसगांव शहरातून होणारी अवजड वाहन वाहतूक बंदी साठी नागरिकांचे निवेदन

Read Time2 Minute, 10 Second

चाळीसगाव (प्रतिनीधी)- चाळीसगाव शहरातुन अवजड वाहने राजरोसपणे धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या वाहतुकीला बंदी न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांच्या वतीने वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांना दि १६ रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. वाहतुक शाखेचे हवालदार हेमंत शिरसाठ यांना निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव शहरात औरंगाबाद, धुळे, मालेगाव येथून येणारी अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात अनेकांचा मृत्यु झाला आहे. शहरातील नागरीकांना या अजवड वाहनांच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत आहे.अवजड वाहनांमुळेच शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असतांना ही वाहने शहरातून धावतात. चाळीसगाव शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना धुळे-मालेगाव बायपास, औरंगाबाद बायपास मार्गाने जाण्याची सक्ती करावी व त्यांना शहरात येण्यास बंदी घालावी.
येत्या ८ दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास नागरीक रस्त्यावर उतरतील असा इशारा वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक यांना देणात आला आहेे. निवेदनावर पत्रकार मुराद पटेल, अजय जोशी, आरिफ खाटीक, विजय गायकवाड,रवींद्र सूर्यवंशी, सचिन फुलवारी, राहुल पाटील, दिनेश घोरपडे, अक्षय गायकवाड, राहुल गायकवाड, नितीन गायकवाड, मनिष मेहता , पंकज पाटील, दिनेश साबळे, कुलदीप नेवरे, सागर झोडगे, अजय घोरपडे यांच्या सह्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post प्राथमिक शिक्षकांचा शिक्षक ते आमदार प्रवास करणारा दमदार नेता हरपला.
Next post नगरदेवळे येथे श्रवण कुमार बहुउद्देशिय दिव्यांग विकास संस्था व महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास संघटना आयोजित मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
error: Content is protected !!
%d bloggers like this: