चाळीसगाव शहरातील प्रभागातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अन्यथा चिखलफेक आंदोलन रयत सेना

संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नागरी नगरउत्थान योजनेतुन चाळीसगाव शहरात मलनिस्सारण योजनेची ( भुयारी गटार ) कामे पूर्ण झालेल्या प्रभागात रस्त्यांची कामे सुरू करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे दि २७ रोजी न पा उपमुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे लवकरात लवकर कामे सुरु न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर चिखलफेक आंदोलन कारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की नागरी नगरउत्थान योजनेतुन चाळीसगाव शहरात मलनिस्सारण योजनेचे ( भुयारी गटार ) कामे जवळपास पूर्ण होत आले आहे. मलनिस्सारण योजनेचे कामे करत असताना प्रभागतील रस्ते खोदण्यात आल्याने रस्त्यांची पूर्णतः चाळण होवून काही ठिकाणी चिखलाच्या रस्त्यावरून मार्ग काढताना शहरवासीयाना मोठी कसरत करावी लागली यामुळे संबंधित ठेकेदारा विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून ज्या प्रभागात भुयारी गटारीचे कामे झाली अशा प्रभागात लवकरात लवकर नगरपरीषदेच्या वतीने नवीन रस्ते बनविण्यात येउन शहरवासीयाना रस्त्याच्या समस्येतून मुक्त करण्याची मागणी न पा उपमुख्याधिकारी फडतरे मॅडम यांना रयत सेनेच्या वतीने दि २७ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नगरपरिषदेच्या वतीने लवकरात लवकर रस्त्यांची कामे न झाल्यास रयत सेना नगरपरिषद कार्यालयासमोर चिखलफेक आंदोलन करेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे,विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,शेतकरी सेनेचे तालुका उपाध्यक्ष किरण पवार, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर,शहर अध्यक्ष छोटू अहिरे, मा. शहर अध्यक्ष योगेश पाटील ,तालुका संघटक संजय राठोड,तालुका उपाध्यक्ष, भरत नवले, मुकुंद पवार, विलास मराठे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे,शहर संघटक दिपक देशमुख, सतीश पवार, प्रशांत आजबे,बाळू शिंदे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.