चाळीसगाव शहरातील भाजपा व समविचारी नगरसेवक/नगरसेविका यांची अंत्योदय जनसेवा कार्यालयात बैठक घेतली.

Read Time2 Minute, 6 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोरोणा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनुसार व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील भाजपा व समविचारी नगरसेवक/नगरसेविका यांची अंत्योदय जनसेवा कार्यालयात बैठक घेतली.या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात भाजपचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी जास्तीतजास्त गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
त्यानुसार शहरात लॉकडाऊन मूळे ज्यांचा रोजगार जाऊन उपासमारीची वेळ आली आहे अश्या गरजू नागरिकांना घरपोच जेवणाचे दररोज १५०० पॅकेट आपल्यामार्फत उपलब्ध केले जाणार असून ते शहरातील प्रभागाचे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी यांच्याहस्ते वितरण केले जाईल तसेच सध्याची भीतीची परिस्थिती पाहता वैद्यकीय सेवेवर पडणारा ताण लक्षात घेत अंत्योदय जनसेवा कार्यालयात मोफत ‘जनसेवा क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहर व ग्रामीण भागात औषध फवारणी साठी स्वखर्चातून ६ फवारणी यंत्र देणार असल्याची माहिती यावेळी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासह बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि Home Q सुविधांचा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख(आमदार) यांनी घेतला आढावा.
Next post कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर
error: Content is protected !!
%d bloggers like this: